Nanded News 
नांदेड

नांदेडच्या अथर्व उदावंतची झेरॉन प्रोडक्शनच्या मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी निवड 

शिवचरण वावळे

नांदेड - लॉकडाउन काळात अनेक तरुण आणि वयोवृद्धांना नाविलाजाने स्वःताला घरात कोंडून घ्यावे लागले होते. दरम्यान अनेक तरुणांनी शाळा, महाविद्यालय आणि जिम बंद असताना देखील स्पर्धापरिक्षेसोबतच पिळदार शरिरयष्टी कमावण्याकडे अधिक लक्ष दिले आहे. बीसीएचा विद्यार्थी असलेल्या नांदेडच्या अथर्व उदावंत याने देखील पिळदार शरिर कमावण्यासोबतच मॉडलिंगसाठी वेळ दिला आणि ‘झेरॉन प्रोडक्शनच्या मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. 

लॉकडाउन काळात घरात बसणे हे सर्वांसाठी मोठे आव्हानच होते. घराबत बसल्याने कोरोनापासून बचाव झाला असला, तरी मोबाईलच्या अतिवापराने डोळ्यांचे आजार, पोट सुटणे, गुडघे, कंबर दुखी, मानसिक तनाव असे इतर आजाराने जुनाट व नवीन आजाराने मात्र डोके वर काढल्याचे दिसून आले. दुसरीकडे शहरातील शेकडो तरुण घरात राहून डायट सोबतच आॅनलाइन अभ्यास करणे, स्वःताचे फोर्ट फोलिओ तयार करुन ते सोशल मीडियावर शेअर करत होते. 

पिळदार शरिरारोबतच मॉडलींग करण्यावर भर 

सगरोळीच्या सैनिक शाळेत सहा वर्षापर्यंत सैनिकी प्रशिक्षण घेतलेल्या व सध्या एमजीएम महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेणाऱ्या अथर्व उदावंत या तरुणाला देखील रिकाम्या वेळेत पिळदार शरीरासोबतच मॉडलिंग करण्याचे ठरवले आहे. यासाठी अथर्वने घरात राहून व्यायाम करण्यासोबतच मसालेदार पदार्थ, मटन, मिठ, साखर, चमचमित पदार्थ, चायनीज पदार्थ न खाता प्रोटीनयुक्त अन्न व दूध, चिकन, अंडी खाण्यावर अधिक भर दिल्याने अगदी दोन महिण्याच्या कालावधीत ‘अथर्व’ने पिळदार शरिरारोबतच मॉडलींग करण्यावर अधिक भर दिला आहे. त्याचे सोशल मीडियावरील व्हायरल फोटो तरुणाईला भुरळ घातलताना दिसून येतात.

मिस्टर इंडिया मॉडलिंग स्पर्धेसाठी देशभरातील २५० विद्यार्थ्यांची निवड 

शहरात मॅडलींगचे वातावरण नसताना अथर्वला वडील संजय उदावंत यांच्याकडून प्रोत्साहन मिळत असल्याने त्याने प्रत्येक गोष्ट नव्याने शिकण्याचे ठरविले आहे. सहा महिण्याच्या मेहनतीतून त्याची देशातील नामांकित अशा ‘झेरॉन प्रोडक्शनच्या मिस्टर इंडिया मॉडलिंग स्पर्धेसाठी त्याची निवड निवडली आहे. यास्पर्धेत देशभरातील २५० विद्यार्थ्यांची निवड झाली असून, हि स्पर्धा पुणे येथे होणार असून, अंतिमस्पर्धा दिल्ली येथे होणार आहे. 

जगात कुणीही परिपूर्ण नाही
नांदेडसारख्या शहरात असल्याने मला फार कुणाचे मार्गदर्शन मिळत नाही. मात्र मी माझ्यातील चुका शोधुन त्या सुधारणाचा प्रयत्न करतो. भविष्यात टाईम्स आॅफ इंडियाच्या मिस्टर इंडिया स्पर्धेत मॉडेल म्हणून निवड होण्याची इच्छा आहे. कोरोनाचे संकट टळल्याने व महाविद्यालय सुरू झाल्यास दिल्लीतील जाऊन मॉडलिंगचे प्रशिक्षण घेणार आहे. जगात कुणीही परिपूर्ण नसतो. 
- अथर्व उदावंत, मॉडेल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT