file photo 
नांदेड

नांदेड : ऑटो उलटून चालकाचा जागीच मृत्यू . हनेगाव- लोणी रस्त्यावरील घटना

उमाकांत पंचगल्ले

हणेगाव (जिल्हा नांदेड )- भरधाव वेगात असलेला अपे ऑटो उलटून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना (ता. पााच) शनिवार रोजी सकाळी हाणेगाव- लोणी रस्त्यावर घडली आहे.

मरखेल पोलिस ठाण्याकडून प्राप्त माहितीनुसार ऑटो चालक संतोष बाबुराव वलुरे (वय 30 वर्ष) राहणार लोणी याने आपला (एम.एच.26 डी7051) तीन चाकी ॲपे ऑटो भाड्याने  हणेगाव येथे जाऊन परत आपल्या गावी लोणीकडे येत असताना देगलूर- हणेगाव रस्त्यावरील लोणी माळावरून भरधाव वेगात असलेल्या ऑटो वरून त्याचा ताबा सुटला व ॲपे उलटून पडली. यामध्ये संतोषच्या डोक्याला मोठा मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सदरील घटना ही शनिवार रोजी सकाळी 9:30 च्या सुमारास घडली असून ऑटोमध्ये असलेला दुसरा व्यक्ती गज्जु इबिते रा.लोणी  याच ऑटो मध्ये गावाकडे येत होता,परंतु सावध गिरी बाळगून चालत्या ऑटो मधून बाहेर उडी मारल्याने तो बालंबाल वाचला असून किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मरखेल पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT