file photo 
नांदेड

नांदेड : पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांचे बिऱ्हाड पाठीवर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : लॉकडाउनमध्ये अनेकांच्या हातचे काम गेल्याने हातावर पोट असणाऱ्यांनी आपली जमा पुंजी कशी तरी सात महिणे चालविली. मात्र अजूनही जिल्ह्यातील शासकिय योजनेअंतर्गत रोजगार हमीची कामे सुरु करण्यात आली नाहीत. त्यामुळे आता अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विशेष करुन सिमावर्ती भागातील कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी आपले बिऱ्हाड पाठीवर टाकून परप्रांतात जात आहेत. तिथेही त्यांच्या हाताल काम मिळेल याची शास्वती नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

जिल्ह्यात घरकुल व विहिरीचे कामे वगळता मजुरांच्या हाताला मोठ्याप्रमाणावर मिळेल असे एकही काम सुरू नसल्याने कामाच्या शोधात सर्वच तालुक्यातील व जिल्ह्यातील मजूर परप्रांतात जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नवीन एकही काम सुरू नसल्याने हजारो कुटुंबातील कामगार आपल्या कुटुंबियासह कामाच्या शोधात निघाले आहेत. 

हजारो हात रिकामे आहेत

जिल्ह्यातील कामगारांच्या हाताला काम देण्यास जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याने मागेल त्याला काम या प्रमाणे कामाप्रमाणे दाम या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. किनवट तालुक्यासह अन्य सर्वच तालुक्यात हे चित्र आहे.  ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे घेण्यासाठी स्कोप असतानाही मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायती असो किंवा यंत्रणा सपशेल अपयशी ठरले आहेत. परिणामी हजारो हात रिकामे आहेत. दोन फेब्रुवारी २००६ रोजी सर्व योजना गुंडाळून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अस्तित्वात आल्यापासून एकही काम नसल्याचे दिसुन येत आहे. 

शेजारील राज्यात मजूरांचे कामासाठी स्थलांतर

मजुरांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर मागच्याही वर्षी काम मिळाले नाही. गतवर्षी इतर सार्वजनिक विहिरी व घरकुलाचे काम आणि काही रोपवाटिकेचे काम सोडले तर जास्त दिवस हाताला काम मिळेल असे कोणतेही काम देण्यात आले नव्हते. मजुरांना सीमावर्ती भागातील आदिलाबाद, निझामाबाद, बिदर, निर्मल, म्हैसा या तेलंगना व कर्नाटकातील जिल्ह्यात कामाच्या धात जात आहेत. सहा- सात महिन्यापासून मजुरांचे हात रिकामे आहेत. आता पावसाळ्याचे दिवस संपल्याने येत्या काळात मजुरांच्या हाताला काम द्यावे अशी अपेक्षा मजूर वर्गातून केली जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

बाबो...! 'हा' अभिनेता चक्क विकतोय सिलेंडर, १० लाख रुपयांना एक सिलेंडर आणि...

Latest Marathi News Live Update : धुळ्यात गॅस टंचाईमुळे लाकडांची विक्री वाढली

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, भजी आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

SCROLL FOR NEXT