Nanded banana crop Survey Agriculture Minister Bhuse orders sakal
नांदेड

नांदेड : बागायतदारांना मिळणार दिलासा

पाचशे हेक्टरवरील केळी पिकाचे कृषिमंत्री भुसेंनी दिले पंचनाम्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : हिंगोली लोकसभा मतदारसंघात बुधवारी अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह जोराचा पाऊस झाल्याने जवळपास पाचशे हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शेतकरी संकटात सापडला आहे. याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन सदरील केळी पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केल्यानंतर कृषी मंत्री भुसे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे करुन माहिती सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशे हेक्टर केळी पिक बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.

बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे केळी पिकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून घरांची देखील पडझड होऊन नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा अनेक ठिकाणी गुरे-ढोरे यांना देखील फटका बसला आहे. अनेक जनावरे दगावली आहेत. कृषिमंत्री भुसे यांनी देखील खासदार पाटील यांच्या निवेदनाची दखल घेत संबंधीत अधिकारी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे, हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशात विविधता, भांड्याला भांडं लागतं, कुठे ना कुठे आवाज होतो; पण कायदा पाळला पाहिजे : सरसंघचालक

Dussehra Melava 2025 Live Update : थोड्याच वेळात मनोज जरांगेंचा दसरा मेळावा, रुग्णवाहिकेतून रवाना...

Bhavangad News:'श्री क्षेत्र भगवानगडाला मिळाली चार हेक्टर जागा'; महंत डॉ. नामदेवशास्त्रीच्या मागणीला यश, मुख्यमंत्र्यांकडून पाठपुरावा

IND vs WI 1st Test Live: W,W,W! मोहम्मद सिराजने 'सापळा' रचला, ब्रेंडन किंगचा उडवला त्रिफळा! विंडीजला चार धक्के, Video

चक्क 200MP कॅमेरा, 6500mAh बॅटरी 90W चार्जिंग; भारतात 'या' तारखेला लाँच होणार Vivo V60e स्मार्टफोन, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT