Nanded barbada Co operative Societies Elections 
नांदेड

नांदेड : शेतकरी विकास आघाडीने विजयाचा गुलाल उधळलाच

बाळासाहेब धर्माधिकारी व बालाजी मद्देवाड ठरले किंगमेकर

सकाळ वृत्तसेवा

बरबडा : बरबडा व नायगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे राजकीय सर्कल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बरबडा सर्कलमध्ये बरबडा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी तेरा पैकी दाहा जाग जिंकून पुन्हा एक हाती सत्ता हस्तगत केली असून अखेर बाळासाहेब धर्माधिकारी, बालाजी मद्देवाड हे हुकमी एक्का ठरले असून भूमिगत विरोधकांना लगाम लावण्यात राजकीय खेळी प्रभावी ठरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

बरबडा गावात सोसायटीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केला दोन्ही गटाच्या समझोता झाल नसल्याने निवडणुकीचे रणशिंग फुंकले. सोसायटीच्या निवडणुकीत बाळासाहेब धर्माधिकारी व बालाजीराव मद्देवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास आघाडी पॅनेल उभे केले होते. यांच्यासह आदींनी शिस्तबद्ध प्रचाराची आखणी केली होती. यात विरोधी गटाचा दणदणीत पराभव झाला आहे. भाजपचे दिलीपराव धर्माधिकारी, गंगाधर बडूरे यांचा पराभव झाला आहे.

बरबड्याच्या शेतकरी विकास पॅनेल नावाने बाळासाहेब धर्माधिकारी, भास्कररावजी धर्माधिकारी, बालाजीराव मदेवाड यांनी दत्त मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला आणि गुरुकृपा नाव ठेवणाऱ्याचे शेतकऱ्यांच्या पॅनेलला अखेर गुरुने आशीर्वाद दिला. प्रचंड मतांनी संचालक निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.आय. अली यांनी काम पाहिले आहे. बरबडा बिट येथील पोलिस ठाण्याचे रमेश निखाते, लक्ष्मण सोनकांबळे, कंधारे यांच्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पाडावी अशी गावकऱ्यांची इच्छा होती. या मुळे गावात डिवचण्याचा प्रयत्न केला, परंतु गावकऱ्यांनी एकसंघ होवुन बाळासाहेब धर्माधिकारी व बालाजी मद्देवाड यांच्या नेतृत्वावर विशवास ठेवून सोसायटीवर झेंडा फडकवला आहे.

- बाळासाहेब धर्माधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT