अशोक चव्हाण  sakal
नांदेड

Nanded :‘भारत जोडो यात्रा’ जनजागृती व्हॅनचे उद्‍घाटन ; अशोक चव्हाण

कॉँग्रेस पक्षातर्फे यात्रेची तयारी सुरू

राजेश नागरे

नांदेड : कॉँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे येत्या ता. सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात देगलूर येथे आगमन होणार आहे. त्या निमित्ताने जनजागृती व्हॅनचे उद्‍घाटन मंगळवारी (ता. एक) सायंकाळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले.

कॉँग्रेसतर्फे भारत जोडो यात्रेनिमित्ताने डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियल येथे पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण यांनी माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी मंत्री डी. पी. सावंत, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, गंगाधरराव पटणे, ओमप्रकाश पोकर्णा, हणमंत पाटील बेटमोगरेकर, शिवसेना (ठाकरे गट) भुजंग पाटील, जनता दलाचे पी. डी. जोशी पाटोदेकर, सुर्यकांत वाणी, रिपाई गवई गटाचे भगवान ढगे, पीआरपी कवाडे गटाचे बापूराव गजभारे, भाकपचे प्रदीप नागापूरकर, प्रा. डी. बी. जांभरूणकर, कॉँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

भारत जोडो यात्रा हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम नसून, एक लोकचळवळ बनली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, जनता दल अशा राजकीय पक्षांसह, लोकचळवळी, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, विचारवंत अशा अनेक घटकांकडून भारत जोडोला यात्रेला समर्थन मिळाले आहे. या यात्रेचे स्वागत करण्याचे, सहभागी होण्याची संधी नांदेड जिल्ह्याला लाभणार आहे. यात्रेचे मोठे आयोजन असून आपण यापूर्वीही अनेक कार्यक्रम केले आहेत. गुरुता गद्दी त्रिशताब्दी वर्षाचा सोहळा देखील एक मोठे आयोजन होते. तशाच प्रकारचे मोठे आयोजन यात्रेचे आहे. आमची संपूर्ण टीम मागील महिन्याभरापासून कामाला लागली असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT