Biometric machines  sakal
नांदेड

नांदेड : बायोमेट्रिक मशीन ठरतेय निरर्थक

माहिती भरता येत नसल्याने रास्तभाव दुकानदार त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शासनाच्या अन्नपुरवठा विभागाच्यावतीने बायोमेट्रिक मशीनच्या साहाय्याने रेशनचे धान्य वितरण योजना राबविली जात आहे. या मागील उद्देश वितरणप्रणालीत पारदर्शकता हा असला तरी या बायोमेट्रिक मशीनवर ग्रामीण भागात ग्राहकांच्या बोटांचे ठसे स्कॅन होत नाहीत. त्यामुळे लाभार्थी पुरते त्रासले आहेत. माहिती भरता येत नसल्याने राशन दुकानदारदेखील त्रस्त झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

पूर्वी स्वस्त धान्य दुकानात सुरु असलेला अनागोंदी कारभार व योग्य लाभार्थ्यांना माल दिला की नाही, याची आॅनलाइन माहिती शासनाला मिळावी म्हणून शासनाने सरकारी स्वस्त धान्य दुकानात २०१७ मध्ये बायोमेट्रिक मशीन वापरणे बंधनकारक केले. या मशीनवर लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती व डाटा अपलोड करण्यात आला. त्यामुळे रेशनचा माल त्याच लाभार्थ्याने उचलला आहे का, याची आॅनलाइन माहिती जिल्हा पुरवठा विभागाला मिळते. परंतु, आता बायोमेट्रिक मशीन रेशनधारकांसाठी मारक तर दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरू पहात आहे.

बोटांचे ठसेच उमटत नाहीत

विविध कारणांनी रेशनधारकांची बोटे बायोमेट्रिक मशीनवर स्कॅन होत नाहीत. अनेक लाभार्थी आता वयोवृद्ध आहेत. अशा लाभार्थ्यांची बोटे मशिनवर स्कॅन होत नाहीत. त्यामुळे हे लाभार्थी धान्यापासून वंचित राहत आहेत. ज्या लाभाऱ्थ्यांची बोटे स्कॅन होत नाहीत, अशा लाभार्थ्यांच्या वारसांची नावे मशीनमध्ये अपलोड करण्यासाठी राशन दुकानदारांनी प्रस्ताव पाठविलेला आहेत. त्यातील काही वारसांची नावे मशीनमध्ये अपलोड झालीत. तर बऱ्याच वारसांची नावे अपलोड झाली नसल्याची माहिती आहे.

नेटवर्कची अडचण

आजही ग्रामीण भागात मोबाईलला नेटवर्क नसते. त्यामुळे बायोमेट्रिक मशीन काम करत नाहीत. नागरिकांना ठसा देता येत नाही. त्यामुळे माहिती भरता येत नसल्याने ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदार तर ठसे स्कॅन होत नसल्याने लाभार्थी वैतागले आहेत.

पाच वर्षानंतरही देखभाल नाही

शासकीय स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, यासाठी शहरासह ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदारांना २०१७ मध्ये बायोमेट्रिक मशीनचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. परंतु, जवळपास पाच वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरदेखील या मशीनची देखभाल झिरो असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व शिधापत्रिकाधारक लात्रार्थी त्रस्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT