file photo
file photo 
नांदेड

नांदेड : जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची पोलिस उपमहानिरीक्षकांकडे भाजपची मागणी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून मटका, गुटखा आदी अवैध धंदे जोमात सुरु आहेत. हे सर्व अवैध धंदे बंद करुन गुन्हेगारीवर आळा घालावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी दिला आहे.

राज्यात गुटखा बंदी असतांनाही जिल्ह्यात मात्र गुटख्याची खुले आम विक्री सुरु असून मराठवाड्यात सर्वत्र गुटख्याचे वितरण होत आहे. त्याच बरोबर शहरासह तालुक्यात गल्लीबोळात मटका अड्डे सुरु असून यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एवढेच नव्हे तर बलात्कार, दिवसा ढवळ्या महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या गंभीर घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून पोलीस प्रशासन करतंय काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालून अवैध धंदे बंद करावेत या मागणीचे निवेदन पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांना देण्यात आले. तसेच येत्या 15 दिवसात जिल्ह्यातील अवैध धंदे बंद न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे-चिखलीकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अजयसिंह बिसेन, सरचिटणीस विजय गंभीरे, अशोक पा. धनेगावकर, अ‍ॅड. दिलीप ठाकुर, कुणाल गजभारे, व्यंकट मोकाले, अनिल हजारी, शितल खांडील, सुशिल चव्हाण, डॉ. शितल भालके, चित्ररेखा गोरे, मिनल खतगावकर, चंचलसिंघ जट, मनोज जाधव, मारोती वाघ, धिरज स्वामी, अकबर खॉन पठाण, व्यंकटेश जिंदम, सचिन रानबा, साहेबराव गायकवाड, राजेश गायकवाड, राजेश कपुर, वैजनाथ देशमुख, भालचंद्र पत्की, सुरेश निल्लावार, लक्ष्मण पांचाळ, राजय यादव अक्षय अमिलकंठवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT