file photo 
नांदेड

नांदेड : जवळगांव येथे 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह, मृतदेहाजवळ काळी पोत आढळून आल्याने घातपाताचा संशय

प्रकाश जैन

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : हिमायतनगर तालुक्यातील जवळगांव येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सदरची घटना शुक्रवारी (ता. १८) रात्री घडली असून शनिवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आली आहे. मृतदेहाजवळ काळी पोत सापडल्याने घातपाताची शक्यता आहे की काय असा संशय व्यक्त होत आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील जवळगांव येथून वाहणाऱ्या लेंडी नाल्याशेजारी देविदास केरबा बासरकर (वय ५५) रा. जवळगांव (ता. हिमायतनगर जि. नांदेड) यांचा मृतदेह आढळून आला आहे. ता. १९ डिसेंबर शनिवारी सकाळी शेताकडे कामानिमित्त निघालेल्या नागरिकांना हा प्रकार दिसला. या घटनेची माहिती पोलिस पाटील पांडूरंग पाटील यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक श्री. देवकते, बालाजी महाजन, पोलिस नाईक राजेश घुन्नर यांनी घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करुन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅ. प्रविण करडे यांनी शवविच्छेदन केले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

मयताचा मुलगा संदिप देविदास बासरकर यांचे फिर्यादीवरुन हिमायतनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी एका संशयीत महिलेला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरु आहे. शवविच्छेदन अहवाल व पोलीस तपासाअंती सर्व काही स्पष्ट होणार असून पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्री. देवकते तपास करत आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT