file photo 
नांदेड

नांदेड : मराठा आरक्षणासाठी निवडणुकांवर बहिष्कार, नांदेडमधील सुगाव बुद्रुक व निवघा ग्रामस्थांचा निर्णय

प्रल्हाद कांबळे

नांदेड  : मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही
तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीत भाग घेणार नाही असा निर्णय घेऊन नांदेड
तालुक्यातील सुगाव बुद्रुक तसेच मुदखेड तालुक्यातील निवघा येथील
ग्रामस्थांनी आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार
टाकला आहे.


मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर हा प्रश्न उच्च न्यायालयानंतर आता
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे आरक्षणाबाबत अद्याप याबाबत
निर्णय झाला नाही, यामुळे मुलांच्या शैक्षणिक भवितव्य बाबत चिंतीत
असलेल्या गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे हत्यार उपसले आहे.
अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाची मागणी करूनही याबाबत निर्णय होत
नसल्याने निराश झालेल्या सुगाव बुद्रुक (ता. नांदेड) व निवघा (ता.
मुदखेड) येथील ग्रामस्थांनी सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीसह
आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकांवर
बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासन
तसेच तालुका प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे कळवून करून जोपर्यंत
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत भाग न
घेण्याचा निर्णय कळविला आहे. या शिवाय पंतप्रधान, राष्ट्रपती,
मुख्यमंत्री यांना निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत. याबाबत जिल्हा
प्रशिक्षण गावकऱ्यांची कशाप्रकारे समजूत काढते याकडे लक्ष लागले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT