file photo 
नांदेड

नांदेड : राष्ट्रीय लोकअदालतीत कोवीड अनुषंगाने प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या सूचना

प्रल्हाद कांबळे

नांदेड  :-  जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत कोवीड-19 या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होउ नये म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी नागरिकांकरीता मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

यात नागरीकांनी येतांना मास्क लावून येणे. सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. ज्या व्यक्तीची तडजोडी करीता आवश्यकता आहे. त्यांनीच न्यायालयात लोकन्यायालयाकरीता उपस्थित रहावे. न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तापमापकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोविड-19 या संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्याकरिता शासनाने नेमुन दिलेल्या नियमांचे व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीराम आर. जगताप व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्यायधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे.

न्यायालयात प्रलंबित असलेले दावे तडजोडीने आणि सामंजस्याने निकाली निघावेत यासाठी लोकअदालतीत व्हॉटसअप व्हिडिओ कॉलींग या सुविधेच्या वापरास राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी परवानगी दिलेली आहे. कोरोना काळात ज्यांना न्यायालयात येणे अशक्य असेल त्यांनी व्हॉटस अप सारख्या सोशल मिडियाचा वापर करुन तडजोड घडवून आणता येईल. त्याकरीता पक्षकाराची ओळख पटवून न्यायालयात तडजोड होऊ शकते. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता पक्षकारानी आपल्या वकीलांना फोन करुन यासुविधेचा लाभ पक्षकारांना घेता येईल असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT