file photo 
नांदेड

नांदेड : बालकांना समाजाने योग्य वळण लावावे : विद्या आळणे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : लहान बालकांना योग्यवेळी योग्य तो मार्ग दाखवला तर ते निश्चीतच ते चांगल्या मार्गावर चालतात. यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकांनी बालकांच्या मनावर चांगले प्रतिबिंब उमटतील याची काळजी घेत त्यांना चांगले वळण द्यावे असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी केले. त्या हजुर साहिब रेल्वेस्थानक येथे आयोजीत एका कार्यक्रमात बोलत होत्या.

जिल्हा महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा संरक्षण कक्षाच्या वतीने नांदेडच्या हजूर साहिब रेल्वे स्थानकावर बालकांचे हक्क सुरक्षीतता सप्ताह व आंतरराष्ट्रीय दत्तक महिन्याचा पार्श्वभूमीवर नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम व दत्तक विधान प्रक्रिया तसेच बालकांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बालकांचे हक्क व सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना बालकांसाठी महत्त्वपूर्ण यंत्रणा याबाबत कार्यशाळेत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच बालकांना योग्य वेळी योग्य असे वळण दिले तर ते नक्कीच येणाऱ्या काळात ते चांगली पीढी म्हणून समाजाचे नेतृत्व करु शकतात. त्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्ह्यात बालकल्याण समिती 24 तास कार्यरत असल्याचे समितीच्या सदस्या अॅड. सावित्री जोशी यांनी सांगितले. तसेच बाल न्याय मंडळाचे सदस्य डॉ. हरदिपसिंग यांनी कोरोनाच्या काळात विधिसंघर्षग्रस्त बालकांचे प्रमाण वाढल्याची माहिती दिली. या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्व यंत्रणांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान बाईक यांनी बालकांच्या हक्कासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यशाळेला डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर, रवी कापुरे, ज्योती सावळे, श्री तिवारी यांच्यासह रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी, शिशुगृह अधीक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सफाई कामगार व चाईल्डलाईनचे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फरसावाले बाबा कोण? मृत्यूमुळे शिष्य आणि भाविक आक्रमक, महामार्ग रोखला

World Record: १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय T20त शतक! नाबाद १११ धावांनी रचला इतिहास; अनेक विक्रम मोडले, फलंदाजने मैदान गाजवले

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

SCROLL FOR NEXT