file photo 
नांदेड

नांदेड : नागरिकांनी खात्री करूनच मालमत्ता कर भरावा- प्रवीण साले

प्रल्हाद कांबळे

नांदेड - वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या तर्फे नागरिकांना मालमत्ता कर भरण्या बाबत नोटीस देण्यात आले असून देण्यात आलेल्या मालमत्ता कराच्या नोटिसाची नागरिकांनी खात्री करूनच कर भरावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे.

शहरातील जो जुना गावठाण भाग आहे, त्या भागातील निवासी मालमत्तांना अकृषिक कर लागत नाही. ज्यांची व्यावसायिक मालमत्ता आहे अशाच लोकांना कर लागू शकतो. त्यामुळे मनपाचे बिल कलेक्टर कर वसुलीसाठी आल्यास आपल्या मालमतेची खात्रीकरूनच कर भरावा असे वाहन प्रवीण साले यांनी केले आहे.

व्यावसायीक मालमत्ता नसेल तर अकृषीक कर लागणार नाही. शहरातील चौफाळा, होळी, करबला, नर्सिंग गल्ली होळी, सिद्दनाथ पुरी टेकडी, ब्रम्हापुरी टेकडी, पाठक गल्ली, अरबगली, गाडीपुरा, कुंभार टेकडी,चांभार वेस, मंढई, धनगर टेकडी, गुरुद्वारा परिसरातील जुना भाग,  वजिराबाद परिसर आदी भागाचा समावेश गावठाणमध्ये होतो. या भागातील नागरिकांनी आपले मालमत्ता कर भरण्यापूर्वी वरिल बाबींचा विचार करावा आपल्या मालमतेची खात्री करूनचं कर भरावा. तसेच सदरील भागातील नागरिकांनी अडचण आल्यास तात्काळ माझ्याशी किंवा भाजपा पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही प्रवीण साले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT