file photo 
नांदेड

नांदेड: अज्ञात वाहनाच्या धडकेत सहशिक्षकाचा जागीच मृत्यू

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : नातेवाईकाच्या भेटीसाठी आलेल्या सहशिक्षकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 28) अर्धापूर -नांदेड रस्त्यावरील शिवामृत डेअरी रस्त्यावर रात्री आठ ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास झाली आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मयत सहशिक्षक हा वाघी (ता. जि. नांदेड ) येथील रहिवाशी होता.

या अपघाताबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, विलास भाऊराव भोसले (वय 50) रा वाघी. ता. जि नांदेड हा काही कामानिमित्ताने अर्धापूर तालुक्यात आला होता. अर्धापूर ते नांदेड रस्त्यावरील शिवामृत डेअरी परिसरात रस्ता ओलांडून जात असतांना अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव व हलगर्जीपणाने चालून जबर धडक दिली. यात विलास भोसले यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी मयत शिक्षकाचा भाऊ चंद्रकांत भोसले यांनी  दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकाविरुध्द अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मयत शिक्षक विलास भोसले हे नांदेड येथील कमला नेहरु कन्या शाळेत सहशिक्षाक म्हणून कार्यरत होता. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वाघी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT