Nanded Collector Office Agitation News 
नांदेड

नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन

पुरोगामी महाराष्ट्रात मातंग समाज कुठेच सुरक्षित नाही

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्यातील मातंग, दलित समाजावर दिवसेंदिवस खून, अत्याचार, जीवघेणे हल्ले, सामाजिक बहिष्कार अशा अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात मातंग समाज कुठेच सुरक्षित नाही. राज्यकर्ते, शासन, पोलीस यंत्रणा हे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या अन्यायी घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच गोविंद कांबळे व जनार्दन कसारे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या व इतर मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील मातंग व दलित बहुजन समाजातील विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष सतीश कावडे, परमेश्वर बंडेवार, चंपतराव हातागळे, मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्र गवाले, संघमित्रा गवळे, मालोजी वाघमारे, अ‍ॅड. बी. एम. गायकवाड, अ‍ॅड. शिवराज कोळीकर, ‍ॲड. बी.एम. बादलगावकर, गंगाधर कावडे, शंकरराव गायकवाड, प्रा. व्यंकट सूर्यवंशी, नागेश तादलापूरकर, भीमराव बल्लूरकर, सर्जेराव वाघमारे, आकाश बरूडे, विशाल कंधारे, साहेबराव गुंडिले, अब्दुल गफार, यादवराव वाघमारे, गंगाधर गायकवाड, सम्राट हटकर, श्याम सरोदे, जयराज गायकवाड, अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे मराठवाडा अध्यक्ष पिराजी गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल घाटे, आनंद वंजारे, यशवंत लखुंडे, जी.आर. सूर्यवंशी, मारोती केंद्रे, कैलास गायकवाड आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT