Nanded Congress Guardian Minister Ashok Chavan bearers and workers meeting
Nanded Congress Guardian Minister Ashok Chavan bearers and workers meeting sakal
नांदेड

नांदेडमध्ये कॉँग्रेसचा किल्ला अबाधित ठेवा; अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : आगामी लोकसभा, विधानसभा आणायची असेल तर ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या ताब्यात असायला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून लोकांमधील उमदवार देऊ. एकंदरीतच नांदेडमध्ये कॉँग्रेसचा किल्ला अबाधित ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी नांदेड शहर व ग्रामीणतर्फे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व संघटनात्मक निवडणुकीबाबत बैठक आज भक्ती लॉन्स येथे मेळावा झाला. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.

यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, वसंतराव चव्हाण, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, सभापती किशोर स्वामी, अपर्णा नेरलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या डाॅ. मिनल खतगावकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, गणपतराव तिडके, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, विठ्ठल पावडे, मंगला निमकर, डाॅ. रेखा चव्हाण, नामदेवराव आईलवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

श्री. चव्हाण म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी तालुका अध्यक्ष दमदार तसेच सर्वांना सोबत घेऊन जाणारा असायला पाहिजे. ओबीसी, मराठा समाजाला निश्चितच न्याय देणार आहे. एक जूनपासून पदवीधरांची नोंदणी करावी. कारण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर सिनेट निवडणुकीत कॉंग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. आमदार राजूरकर यांच्यासारखे अन्य आमदार योगदान देत नसल्याची खंत भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केली. दरम्यान कॉंग्रेस सदस्य नोंदणी सर्वाधिक केल्याबद्दल वर्षा भोसीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मेळाव्याला जिल्हाभरातून कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT