crime
crime sakal
नांदेड

नांदेड : कापसाच्या पिकात गांजाची शेती; आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सकाळ वृत्तसेवा

नायगाव (जि.नांदेड) : कापसाच्या शेतात गांजाची शेती करणाऱ्या बिलोली तालुक्यातील कांगठी येथील शेतकऱ्यांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. २१ किलो वजनाचे १७ झाडे असा एकूण ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. बिलोली तालुक्यातील कांगठी येथील शेतकरी व्यंकट गंगाधर नरवाडे यांनी आपल्या उतरेस जवळपास २३ किमी अंतरावरील गट क्रमांक ३०४ मधील शेतात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली. सदर प्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराटे यांना दिल्या. बोराटे यांनी मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान पथकासह कांगठी येथे थेट शेतातच धाड मारली. यावेळी नरवाडे यांच्या शेतात हिरवट रंगाची लहान मोठी १७ झाडे दिसली. ही सर्व झाडे जप्त करुन त्याचे वजन करण्यात आले असता २१ किलो ५५० झाले असून त्याची बाजारातील किंमत ८६ हजार २०० आहे. हा सर्व मुद्देमाल जप्त करुन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपींनी अंमली पदार्थ विरोधी कायद्याचा भंग करुन विना परवाना व बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्यासाठी कापसाच्या शेतात गांजाची १७ झाडे लावून त्याची जोपासना केल्याचे आढळून आले. त्यामुळे मंगळवारी रात्री उशीरा सदर प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी. जाधव हे करत आहेत. यापूर्वी कुंटूर पोलीस ठाण्यात हद्दीत राहेर येथेही एका शेतकऱ्यांने अशीच वांग्याच्या पिकात गांज्याची शेती केली होती त्यावेळीही स्थानिक गुन्हे शाखेनेच कायवाई करुन आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेतला होता. आणि कालही स्थानिक गुन्हे शाखेनेच कारवाई केल्याने स्थानिक पोलीस यंत्रणा करते तरी काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT