Nanded  Sakal
नांदेड

Nanded : विद्यापीठात एफटीआयआय चे अभ्यासक्रम

नांदेडला मान्यवरांच्या उपस्थितीत सामंजस्य करार, विद्यार्थ्यांना नव्या संधी

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय- पुणे) सहयोगाने अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सोमवारी (ता.तीन) कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केली. संस्था व विद्यापीठ यांच्यात सोमवारी ज्ञानाच्या देवाणघेवाणीसंदर्भात सामंजस्य करार झाला.

या वेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत चित्रपट लघुअभ्यासक्रमाची सुरवात करण्यात आली. ‘एफटीआयआय’चे संचालक संदीप शहारे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कोर्स डायरेक्टर पंकज‌ सक्सेना, डॉ. सर्जेराव शिंदे, डॉ. एल. एम. वाघमारे, डॉ. राजाराम माने, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. अनुराधा पत्की आदी उपस्थित होते.

‘एफटीआयआय’सोबतच्या करारामुळे अध्ययन व संशोधनासंदर्भात विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील असा आशावाद कुलगुरूंनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या प्रयत्नांचे शहारे यांनी स्वागत केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लघु अभ्यासक्रम आयोजित करणारे विद्यापीठ हे राज्यातील पहिले आहे, असेही ते म्हणाले. बीबीसी वर्ल्डवाईड या वाहिनीचे माजी प्रोग्रॅमिंग हेड पंकज सक्सेना यांनी चित्रपटाचे मानवी जीवनाशी असणारे घनिष्ठ नाते यावर भाष्य केले. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी प्रास्ताविक केले.

चार अभ्यासक्रमांचे आयोजन

अनुसूचित जमातीसाठी असणाऱ्या अभ्यासक्रमांची संदीप शहारे यांच्या हस्ते सुरवात झाली. चित्रपट आस्वाद, स्मार्टफोन चित्रपट निर्मिती, चित्रपट अभिनय आणि पटकथालेखन असे चार अभ्यासक्रम पुढील महिनाभर नियोजित आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी डॉ. अनुराधा पत्की आणि डॉ. राहुल गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. तौर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT