coronavirus update 
नांदेड

नांदेडकरांना दिलासा! जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही

शिवचरण वावळे


नांदेड : मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या (Corona) संख्येचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. तर कधी शहरी भागात कोरोनाचा एकही रुग्ण आढळत नाही. शनिवारी (ता.१८) प्राप्त झालेल्या ७१४ अहवालापैकी ७१२ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले यात एकही अहवाल कोरोना बाधित (Corona In Nanded) आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार ३०५ एवढी असून यातील ८७ हजार ६२४ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला २९ रुग्ण उपचार घेत असून तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५२ एवढी आहे. आज जिल्ह्यातील - तीन कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात मनपा अंतर्गत एन. आर. आय. भवन व गृह विलगीकरण- एक, खाजगी रुग्णालयातील- दोन असे एकुण तीन व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. शनिवारी २९ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी - सात, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण- १५, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण- पाच, खासगी रुग्णालय - दोन


कोरोना मीटर
एकूण पॉझिटिव्ह - ९० हजार ३०५
एकूण कोरोनामुक्त - ८७ हजार ६२४
एकूण मृत्यू संख्या - दोन हजार ६५२
शनिवारी पॉझिटिव्ह - शुन्य
शनिवारी कोरोनामुक्त - तीन
शनिवारी मृत्यू - शुन्य
उपचार सुरु - २९
अतिगंभीर प्रकृती - तीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain News: पोलिसांच्या धाडसी कृतीचे कौतुक! शाळेची बस पाण्यात अडकली अन्...; विद्यार्थ्यांच्या थरारक सुटकेचा व्हिडिओ व्हायरल

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Latest Marathi News Live Updates: १४ गावातील रेल्वेचा बोगद्यात साचले पाणी

SCROLL FOR NEXT