file photo 
नांदेड

नांदेड : कौडगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्या 13 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल

प्रल्हाद हिवराळे

उमरी (जिल्हा नांदेड) :- उमरी तालुक्यातील कौडगाव शिवारात बाबुराव येताळे यांच्या शेतामध्ये गोदावरी नदी पात्राच्या काठावर काही व्यक्ती तराफे घेऊन गोदावरी पात्रातील अवैध रेती उपसा करण्यासाठी जमा झाले होते. याची माहिती मिळाल्यानुसार भोकर व धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. या छाप्यामध्ये 12 व्यक्तींना थर्माकोलच्या दोन तराफ्यासह पकडण्यात आले. 

कौडगा येथील माधव येताळे, उत्तर प्रदेश राज्यातील केदार वर्मा, अजितसहा फागुसाहा, शंभु महतो, सुनिल बबन प्रसाद, केदार सतन यादव, रविंद्र कुमार रघुवर यादव, सुंदर कुमार यादव, जोगिंद्र यादव, रुदल श्यामलालसाह, विश्वनाथ कन्हैया साह, जीतन राजावशी साह, राजेश कन्हैया गौर यांना ताब्यात घेऊन पोलिस पुढील तपास करीत आहेत. यात माधव येताळे या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध कठोर पाऊले उचले असून प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांना दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोळेगाव येथील मंडळ अधिकारी मयुर शेळके यांच्या पथकात अशोक गंगासागरे, संतोष मंगरुळे, प्रकाश तायवाडे, हनमंत गायकवाड, मलुकमळे यांनी छापा टाकून करवाई केली.

या आरोपी विरुद्ध कलम महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 क्र. 48 सह कलम 188, 379, 511, 34 भादवी प्रमाणे कायदेशीर फिर्यादीनुसार उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.   

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT