file photo
file photo 
नांदेड

नांदेड : अर्धापुरात दत्त नामाचा गजर; जयंती सोहळा उत्साहात..

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शहरासह तालुक्यातील दत्त नामाचा गजर करित दत्त जयंती सोहळा मंगळवारी (ता. 29 ) उत्साहात साजरा करण्यात आला.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नाम घोषणाने मंदिर दणानून गेले. जयंती सोहळ्याचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरासह तालुक्यात झालेल्या दत्त जयंती सोहळ्यास दत्त भक्तांची खूप मोठी गर्दी झाली होती.

अर्धापूर शहरातील बालाजी मंदिर, विठ्ठल मंदिर, किसन बापू आश्रमात दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने दत्त जन्माच्या आध्यायाचे पठण करुन दत्त जन्मोत्सव व आरती, महापुजा करण्यात आली.शहरातील विविध विविध ठिकाणी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्यास भाविकांनी खुप मोठा प्रतिसाद दिला. 

तालुक्यातील देळूब, पार्डी, मेंढला, लोण आदी गावातील दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरास फुलांनी सजवण्यात आले होते.जन्मोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन भक्तीमय वातावरणात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दत्त नामाच्या गजराने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. देळूब येथील दत्ता जन्मोत्सव हा तालुक्यासह जिल्हात प्रसिद्ध आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमसह यात्रेचे आयोजन करण्यात येते. ही यात्रा बैलगाडीची यात्रा म्हणून ओळखण्यात येते. या यात्रेला पंचक्रोशील भक्त आजही दर्शनासाठी बैलगाडीतून येतात.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT