file photo 
नांदेड

नांदेड : एका घटनेत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; तर दुसऱ्या घटनेत बालकाचा शाॅक लागल्याने मृत्यू

प्रल्हाद कांबळे

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील नागेली येथील एका शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राश करुन आत्महत्या केली. याी प्रकरणी बारड पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. आठ) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

पाटनूर शिवारात बालाजी लक्ष्मण शिंदे (वय ५०) या शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केली ही घटना ता. २५ जानेवारी ते ता. आठ फेब्रुवारीच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की नागेली तालुका अर्धापूर येथील बालाजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत असल्यामुळे ते कर्जबाजारी झाले. शेतातून उत्पन्न कमी झाल्याने कर्जाचा बोजा वाढत गेला. अखेर त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

ता. २५ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांनी विष प्राशन केले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकरणी शंकर लक्ष्‍मण शिंदे राहणार नागेली यांच्या माहितीवरुन बारड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री वानोळे करत आहेत.

विद्यूत शाॅक लागल्याने बालकाचा मृत्यू 

दुसर्‍या घटनेत मुखेड येथे सोमवारी तारीख आठ फेब्रुवारी रोजी सावरगाव तालुका मुखेड येथे घराच्या छतावर खेळणाऱ्या अदनान मोहम्मद बागवान (वय नऊ) याचा विद्यूत पुरवठा उतरलेल्या गजाळीला हात लागला. यात त्याला जबर शॉक लागला आणि त्याचा मृत्यू झाला. मोहमद बागवान यांच्या माहिती वरुन मुखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस हवालदार कामजळगे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT