Nanded Dharmabad Good morning squads action 
नांदेड

नांदेड : धर्माबाद तालुक्यात गुडमॉर्निंग पथक कोमात

उघड्यावर शौचवारी सुरूच; दुर्गंधीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

धर्माबाद : तालुक्यातील ग्रामीण भागात गावखेड्यात असलेली हागणदारी मुक्तीची लाजिरवाणी प्रथा कायमस्वरूपी बंद व्हावी, याकरिता शासनस्तरावरून जनजागृतीसह विविध प्रयत्न करण्यात आले. यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंचायत समितीच्या वतीने गुडमॉर्निंग पथक तयार करण्यात आले होते. परंतु ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या उदासीन धोरणामुळे व लोकसहभागाचा अभाव असल्याने गुडमॉर्निंग पथक कोमात गेल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुडमॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु ही मोहीम गुंडाळण्यात आल्याचे चित्र ग्रामीण भागातील परिस्थितीवरून दिसून येत आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. त्याचबरोबर साथीच्या आजाराचा समूळ नाश व्हावा, याकरिता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण भागात शौचालय बांधण्याकरिता अनुदान दिले.

ज्यामुळे घरोघरी शौचालयही बांधण्यात आले. परंतु त्याचा वापर होणे आवश्यक असताना मात्र बहुतांशी ग्रामस्थांकडून त्याचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा हागणदारीचे साम्राज्य पसरले असल्याने गावात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुरुवातीला ज्या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून सकाळी उघड्यावर स्वच्छ जाणाऱ्यांच्या मनात गुडमॉर्निंग पथकाची धास्ती बसली असल्याकारणाने ग्रामस्थ शौचालयाचा वापर करीत होते.

परंतु आता अशा प्रकारची भीती ग्रामस्थांच्या मनात राहिली नसल्याने उघड्यावर स्वच्छ जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याबाबत ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तरी पूर्वीप्रमाणेच गुडमॉर्निंग पथकाकडून अशा ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई सुरू करावी, अशी मागणी प्रतिष्ठित नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गावात प्रवेश करताच सुटते दुर्गंधी

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. आता ग्रामीण भागात सद्यस्थितीवरून बाहेरून गावात प्रवेश करतांना किंवा गावातून बाहेर जातांना प्रमुख रस्त्यावर दुर्गंधी सुटत असल्याने गावकऱ्यांना नाकाला रुमाल लावून जावे लागत असल्याचे चित्र आहे. काही लोकांमुळे गावात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरीच मंडळी तालुक्यातील गावागावात प्रमुख रस्त्यावर उघड्यावर शौच करीत असल्याचे वास्तव आहे.

शौचालयामध्ये भरतात भंगार

वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी शासनाकडून लाभार्थ्यांना १२ हजार रुपयेचे अनुदान देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी हे अनुदान मिळण्यासाठी नुसत्याच शौचालयाच्या चार भिंती उभारल्या. कागदपत्रे शौचालय उभारण्याचे काम दाखवून शासनाकडून मिळणारे अनुदान मिळण्याचे काम केले. अनेक जण शौचालयाच्या वापर न करता अनेक जण उघड्यावर शौचास जात असतात व शौचालयांमध्ये भंगार भरून ठेवले जात आहे. तर अनेक शौचालय कुलूपबंद अवस्थेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT