नांदेड कोरोनामुक्तीकडे 
नांदेड

दिलासादायक : नांदेडला मंगळवारी कोरोनाचा एकही बाधित आढळला नाही

मंगळवारी (ता. २९ जून २०२१) प्राप्त एक हजार ४९२ अहवालापैकी एक हजार ४७६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. दिवसभरात एकही मृत्यू नाही तसेच आज एकही नवीन बाधित आढळला नाही.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड ः नांदेडकरांसाठी मंगळवार (ता. २९ जून) दिलासादायक त्याचबरोबर आनंददायी ठरला. दिवसभरात एकही रुग्ण कोरोनाबाधित आढळला नाही. त्याचबरोबर एकही मृत्यू दिवसभरात झाला नाही. सध्या १३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेक महिन्यानंतर दिवसभरात एकही रुग्ण आढळून आला नसल्याने नांदेडकरांसाठी आजचा मंगळवार समाधानकारक ठरला आहे.

मंगळवारी (ता. २९ जून २०२१) प्राप्त एक हजार ४९२ अहवालापैकी एक हजार ४७६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. दिवसभरात एकही मृत्यू नाही तसेच आज एकही नवीन बाधित आढळला नाही. दिवसभरात नऊ जणांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ही ९१ हजार २३१ झाली असून त्यातील ८८ हजार ५९७ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. सध्या १३८ रुग्ण उपचार घेत असून चार बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

हेही वाचा - मलिंगा मार्च २०२० पासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे

जिल्ह्यात आत्तापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या एक हजार ९०४ एवढी आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.११ टक्के आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १२४ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे १२९ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

लसीकरण महत्वाचे...

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वांचेच सहकार्य महत्वाचे आहे. कोरोना अजूनही संपलेला नसल्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर पाळावे तसेच लसीकरण करणे महत्वाचे आहे. जास्तीत जास्त लसीकरण करून कोरोनाला हद्दपार करावे.

- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT