file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात वर्षभरात 70 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मागील काही वर्षापासून लहरी निसर्गाच्या मनमानीला त्रासून राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु असले तरी या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. चालू वर्षात नांदेड जिल्ह्यात ७० शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. यातील ५८ शेतकरी कुटुंब शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

लाॅकडाउनमधील मार्च ते मे या तीन महिन्यात राज्यात जवळपास बाराशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. तर याच कालावधीत नांदेड जिल्ह्यात ५८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्येचा विषय मागील अनेक वर्षापासून ऐरणीवर आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्यानंतरही नैसर्गिक आपत्ती आणि त्याद्वारे शेतकऱ्याला कर्जबाजारीपणाकडे जावे लागत असल्याने आत्महत्येचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासन मदत देण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यातून शेतकरी आत्महत्याचे विदारक वास्तव पुढे आले. जानेवारी सात, फेब्रुवारी महिन्यात नऊ, मार्च महिन्यात पाच, एप्रिल महिन्यात नऊ, मे महिन्यात तीन, जून महिन्यात पुन्हा नऊ, जुलैमध्ये तीन, ऑगस्टमध्ये नऊ, सप्टेंबरमध्ये दोन, ऑक्टोबर तीन तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन शेतकऱ्याने अशाप्रकारे वर्षभरात ७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले. या ७० पैकी ५८ शेतकरी कुटुंबाचे प्रस्ताव शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. काही अपात्र तर चार प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT