नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सात लाख ४१ हजार शेतकर्यांचे पाच लाख २७ हजार हेक्टरमधील खरीप, बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. यात बाधीतांना लागणारा ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा निधी बुधवारी (ता.२१) जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या सूचनेनुसार हा निधी लगेच सर्वच सोळा तालुक्यांना वितरीत केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.जिल्ह्यात यंदा जुन ते ऑगस्ट महिन्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक मंडळात एकापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टीची नोंद झाली होती. जुलैमध्ये तर एका महिन्यात विक्रमी ६०६ मिलीमीटर पाऊस होऊन पिकांची दाणादाण उडाली होती. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन नदीकाठची जमिन खरडून गेली. सखल भागातील पिके पाण्याखाली गेल्याने जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मुग या पाच लाख २७ हजार १४१ हेक्टरवरील पिकांसह ३१४ हेक्टरवरील बागायती व ६६ हेक्टरवरिल फळपिके असे एकूण पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. यात सात लाख ४१ हजार ९४६ शेतकर्यांना फटका बसला होता.
या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या नव्या निकषानुसार (दुप्पट भरपाई) जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांची मागणी राज्य शासनानकडे केली होती. यानुसार ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा निधी बुधवारी (ता.२१) जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. यानंतर हा निधी लगेच सर्वच सोळा तालुक्यांना वितरीत केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी दिली.
नुकसानीच्या प्रमाणात मिळणार भरपाई
राज्य शासनाने यंदा भरपाईच्या रकमेत दुप्पट वाढ करुन तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत भरपाई देण्याचे निश्चित केले आहे. यामुळे जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार सहाशे, बागायती पिकांसाठी २७ हजार तर बहूवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये मिळणार आहेत. ही भरपाई नुकसानीच्या प्रमाणात मिळणार आहे. स्थानिक यंत्रणेने पिकांचे ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे दाखविले आहे. यानुसार ही भरपाई मिळेल, अशी माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर अधिकृत सुत्राने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.