file photo 
नांदेड

नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीला अखेर मुहुर्त, सोमवारपासून प्रक्रिया

प्रल्हाद कांबळे

नांदेड : संबंध जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे अनेक कामांना थांबविण्यात आले होते. त्यात राज्यातील बऱ्याच काही निवडणूकांचाही समावेश होता. कोरोनामुळे मुदतवाढ मिळालेल्या नांदेड जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सोमवार (ता. चार) पासून सुरु होत असून त्यासाठीची तयारी केली जात आहे.

कोरोनाचा कहर कमी होत असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर राज्यातील सात जिल्हा बँकांची निवडणूक घेतली जाणार आहेत. त्यात नांदेड जिल्हा बँकेचाही समावेश आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी को- ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ यापूर्वीच संपला असला तरी कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सात जिल्हा बँक आणि ३८ साखर कारखान्याची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. यात नांदेड जिल्हा बँकेचा समावेश होता. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती.

संचालक मंडळाचा पंचवार्षिक कालावधी संपत असल्याने स्थानिक स्तरावर निवडणुकीची तयारी सुरु झाली होती. मतदार यादीचे पुनर्निरीक्षण व नवीनीकरण करण्यासाठी सेवा सहकारी सोसायटीकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. मतदान करणाऱ्या प्रतिनिधीची निवड करुन त्या संबंधीचे रीतसर प्रस्ताव संबंधितांकडून पाठविण्याची प्रक्रिया होत असताना निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. आता राज्याच्या सहकार निवडणूक प्राधिकरणाने स्थगित केलेल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार नांदेड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेतली जाणार असून चार जानेवारीपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पाठोपाठ जिल्हा बँकेची निवडणूक लागली असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण पेटणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन ही निवडणूक प्रक्रिया प्रशासनाला हाताळायचे आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

Latest Marathi Update : युद्धाचा परिणाम झेंडू बाजारावर; दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

धक्कादायक ! ICU मधील वृद्ध महिला रुग्णाला उंदरांनी कुरतडले; रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड

IPL 2026 Marathi News: ना CSK, ना KKR... आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचणार? ऑरेंज कॅप, पर्पल कॅप कोणाला?

SCROLL FOR NEXT