file photo 
नांदेड

नांदेड : जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मरवाळीत बालविवाह रोखला

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड) : जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांना आलेल्या एका निनावी पत्रामुळे मंगळवारी (ता. ३०) नायगाव तालुक्यातील एका १३ वर्षीय बालिकेचा बालविवाह टळला. यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बालविवाह टळला असून पालकांचे समुपदेशन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेने जिल्ह्यातील अनेक बालविवाह थांबविण्यात यंत्रणेला यश मिळत आहे. 

नायगाव तालुक्यातील मरवाळी येथील एका तेरा वर्षीय बालिकेचा विवाह धर्माबाद तालुक्यातील सालेगाव येथील रावसाहेब मारोती गाडे याच्याशी मंगळवार (ता. ३०) रोजी होणार होता. पण सदरची मुलगी ही अल्पवयीन असल्याची तक्रार थेट जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे सोमवारी ( ता. २९) रोजी एका निनावी पत्राद्वारे मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डाॅ. विपीन हे आपल्या यंत्रणला सोबत घेऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एका निनावी पत्राची खात्री करण्यासाठी व हा प्रकार थांबावा यासाठी हे निनावी पत्र जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे पाठविण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी आपल्या सहकाऱ्यांना ही माहिती दिली. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजीक कार्यकर्ते धनाजी कोंडेवाड यांनी संंबधीत गावच्या ग्रामसेवकाला माहिती दिली. त्यानंतर उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तीना संपर्क साधला. 

बाल संरक्षण कक्षाने या प्रकरणी तातडीने दखल घेत सदरची माहिती नायगाव पोलिसांना सांगितली. ही माहिती मिळताच नायगावचे पोलिस निरीक्षक आर. एस. पडवळ यांनी पोलिस हवालदार शेख यांना तातडीने मरवाळी येथे पाठवून संबंधीत बालिकेच्या पालकास ताब्यात घेतले. यावेळी हा विवाह होणार नसल्याचे लेखी जबाब दिला.

यानंतर नायगाव पोलिसांनी धर्माबाद पोलिसांना ही माहिती कळवली. त्यामुळे धर्माबाद पोलिसांनाही तात्काळ सालेगाव येथे जावून मुलाला व त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनाही विवाह करणार नसल्याचे लेखी जबाब पोलिसांना दिला. आणि सदरचे प्रकरण बालहक्क संरक्षण समितीकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे या समितीने ता. ३० रोजी मरवाळी येथे येवून वधू पित्याच्या घरी जावून विवाह थांबवण्यात आलेल्या मुलीच्या वयाचे पुरावे घेवून गेले असल्याची माहिती मिळाली. 

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT