Diwali  sakal
नांदेड

Nanded : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नरसीची बाजारपेठ सजली

वेगवेगळ्या प्रकारांतील कंदील : फॅन्सी पणत्यांची बाजारात चलती विक्रेत्यांनी

सकाळ डिजिटल टीम

नरसी : दिवाळी तोंडावर आल्याने बाजारपेठांमध्ये चैतन्यदायी वातावरण निर्माण होऊ लागले आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. दरवर्षी वाढत जाणाऱ्या महागाईचा परिणाम यंदाही दिवाळीच्या खरेदीवर जाणवत असला तरी, आठवड्याअखेरीस बाजारात खरेदीसाठी गर्दी होईल, असा विश्वास नायगाव तालुक्यातील अनेक विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

दिवाळीत पणत्यांना विशेष महत्त्व असते. यंदा बाजारात पणत्यांचे विविध प्रकार आले असून, त्यात पाण्यावर तरंगणारी कमळांच्या आकारातील पणत्या, हत्तीच्या पाठीवर दिवे अशा फॅन्सी पणत्यांची बाजारात चलती आहे. सेलवर चालणाऱ्या पणत्याही सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आकार व प्रकारांतील कंदील, लायटिंगच्या माळा दाखल झाल्या आहेत. या माळा ४० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत मिळत असल्याने त्या सर्वांच्या आवाक्यात आहेत.

फटक्यांची स्टॉल लागले

दिवाळीत मोठ्याप्रमाणात फटक्यांची आतषबाजी केली जाते. यासाठी शहरांतील गल्लीबोळांमध्ये फटाक्यांचे स्टॉल लावले जातात. हे स्टॉल लावताना अग्निसुरक्षा उपाय करणे आवश्यक असते. यंदा नरसीमध्येही फटाके विक्रीची छोटे-मोठे स्टॉल रस्त्यावर, फूटपाथवर लागले आहेत. याठिकाणी सुरक्षेचीही काळजी घ्यायला हवी, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

कपडे खरेदीला वेग

दिवाळीत प्रामुख्याने खरेदी होते ती कपड्यांची. त्यामुळे या काळात कपडे विक्रेत्यांचा सर्वाधिक व्यवसाय होतो. मात्र, महिन्याची सुरुवात असल्याने आणि पगार, बोनस हातात येणे बाकी असल्याने अजून तरी दुकानांमध्ये ग्राहकांची फारशी गर्दी नसल्याचे काही दुकानदारांनी सांगितले. मात्र, या आठवड्याच्या शेवटी खरेदीसाठी गर्दी होऊन चांगला व्यवसाय होईल, असा विश्वासही नरसी येथील राजेश्वर कापड दुकाचे मालक राजेश्वर मोगलाजी बोडूवाड यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT