thief esakal
नांदेड

Nanded : चोरट्यांची दिवाळी झाली जोरात

तीन ठिकाणी घरफोडी ः पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दिवाळी हा आनंदाचा सण आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये बहुतांश आपापल्या गावी जात असतात. हीच संधी साधून चोरट्यांनी आपला डाव साधून घरफोडी करून दिवाळी साजरी केली. जिल्ह्यात तीन ठिकाणी घरफोडी झाली असून, दोन लाख ४१ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.

विलास धोंडिबा महाजन (रा. तामसा रोड, नई आबादी हदगाव) हे दिवाळीनिमित्त कुटुंबियांसह सासरवाडी येथे गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधून त्यांच्या घराचे कुलुप तोडून रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, होम थेटर, साखर, पंधरा किलो गोडतेल असा एकूण ३९ हजार ३४० रुपयांचा माल चोरून नेला आहे. विलास महाजन यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, सहायक पोलिस निरीक्षक श्री. पांढरे तपास करत आहेत.

तसेच वनिता रामराव राठोड (रा. चिखलवाडी भोकर) याही घराला कुलुप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. त्यांच्याही घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ६२ हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला आहे. भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. कांबळे तपास करत आहेत.

याशिवाय गोविंद हुसेन्ना दुबेवाड (रा. नाईकनगर नांदेड) हेदेखील दिवाळीसणानिमित्त कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. घरी परत आल्यानंतर त्यांना घराचे चॅनल गेट व दाराचे कुलुप तुटलेले दिसले. घरात जाऊन बघितले असताना ४० हजार रुपये किंमतीचे दोन लॅपटाॅप चोरट्यांनीचोरून नेल्याचे दिसले. गोविंद दुबेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. कुरुळेकर तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT