nanded earthquake scared woman tell about everything Sakal
नांदेड

Nanded Earthquake : भूगर्भातून आवाज... हादऱ्यामुळे आम्ही पडलो घराबाहेर, घाबरलेल्या महिलांनी सांगितली आपबिती

Marathwada Magnitude 4.5 earthquake : बुधवारी सकाळी ७ वाजून १४ मिनिटांची वेळ; नांदेडमध्ये दोन ते तीन सेकंद भूकंपाचा धक्का

सकाळ वृत्तसेवा

Nanded: बुधवारी सकाळी ७ वाजून १४ मिनिटांची वेळ. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वारंवार भूकंप होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बुधवारी (ता.१०) सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्‍याची तीव्रता रिश्‍टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आली आहे.

भूकंपाच्या धक्क्याने घरावरील टिनपत्रे, भांडे यांचा आवाज झाल्यावर गल्लीबोळांमधील नागरिक रस्त्यावर आले होते. प्रत्येक जण एकमेकांना सावध करत बाहेर येण्यास सांगत होता. नांदेडमधील मालेगाव रोड, विवेकनगर, जुना कौठा, सिडको, हडको, त्रिरत्ननगर, महावीर सोसायटी, शिवाजीनगर, दीपनगर आदी भागात एकच चित्र होते. या भूकंपाची आपबिती काही महिलांनी ''सकाळ''शी बोलताना व्यक्त केली.

नरसीमध्ये जाणवला सौम्य धक्का

नरसीत बुधवारी सकाळी ७:१५ वाजता भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यावेळी नागरीक काही वेळ घराबाहेर येऊन मोकळ्या जागेत थांबले होते. हा धक्का जाणवल्याचे लक्षात येताच घरातील वडीलधारी मंडळींनी घाबरून न जाता घरातील लहान थोरांना जवळ घेत सतर्कता बाळगत घरासमोरील मोकळ्या जागेत नेले.

काडीपेटी, मेणबत्त्या, दिवे पेटवू नका

भूकंपावेळी काडेपेटी, मेणबत्त्या किंवा दिवे पेटवू नका. वाहनात असाल तर, तेथेच थांबा, घरात टेबलाखाली झोपा, खिडक्या तसेच आरशांपासून लांब थांबा, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

एकदमच बिल्डिंग हादरल्याचे जाणवले...

मालेगाव रोडवरील ज्योती जैन म्हणाल्या, सकाळी सव्वासात वाजताची वेळ, नेमकाच गॅसवर चहा ठेवला अन् आकाशवाणीच्या बातम्या ऐकत होते. एकदमच बिल्डिंग हादरली. सुरवातीला वाटले रस्त्यावरील लोडेड ट्रक असावा; पण बाहेर तसे काहीच नव्हते. हलल्यासारखे जाणवले. भूकंप असल्याचे समजताच घराबाहेर पडले. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना बाहेर बोलावले. बऱ्याच जणांना झोपेतून उठवले. अनेकांना हादरा जाणवलाही नाही. कॉलनीतील नागरिक आम्ही सर्वजण एकत्र जमलो. कित्येक वेळ काहीच सुचत नव्हते.

शेजाऱ्या-पाजाऱ्यांनाही बाहेर आणले...

नेमकेच मुलगा आणि पती शाळेत गेले होते. त्यामुळे मी निवांत झाले होते. दिवाणवर बसताच एकदमच भूगर्भातून आवाज यायला लागला आणि हादरतही होते. हा भूकंप असल्याचे समजले अन्... क्षणाचाही विलंब न लावता घरातून जीव वाचविण्यासाठी बाहेर पडले. दोन ते तीन सेकंद भूकंपाचा धक्का चांगलाच जाणला. शेजाऱ्या-पाजाऱ्यांनाही बाहेर आणले, अशी प्रतिक्रिया सर्वोत्तमनगर येथील दर्शना महाजन यांनी दिली. असाच काहीसा सार्वत्रिक अनुभव बुधवारच्या भूकंपानंतर जिल्ह्यातील नागरिकांना आला.

कित्येक वेळ थरकाप जात नव्हता...

सकाळी शाळेत जाण्यासाठी मुलीची लगबग सुरू होती. तिचा डबा करण्यासाठी मी स्वयंपाक करत होते. तेवढ्यात आवाज येऊन हादरायला लागले. स्वयंपाकघरातील भांडे वाजत होते. भूकंप असल्याचे लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता पतीला उठवले. मी मुलीला व मुलाला कडेवर घेऊन आम्ही सर्वजण घराबाहेर पडलो. अपार्टमेंटमधील सर्वजण एकत्र जमलो. कित्येक वेळ अंगाचा थरकाप जात नव्हता, असे शुभ्रा गुंडकर यांनी सांगितले.

भूकंपरोधक घरासाठी बांधकाम अभियंत्यांचा सल्ला घ्या, भूकंपप्रवण क्षेत्राची माहिती करून घ्या, शक्यतो बांधकामासाठी पुराच्या ठिकाणचा, नदी-नाल्यालगतचा भराव टाकून विकसित केलेला भाग टाळा. भिंतीवर, छतावरच्या प्लॅस्टरला खोल तडे असल्यास ते दुरुस्त करून घ्या. कपाट, फडताळ भिंतीला सुरक्षितपणे बांधून ठेवा, जड वस्तू कपाटात खालच्या कण्यांमध्ये ठेवा, कपाटावर, माळ्यावर अवजड वस्तू ठेवू नका, विजेच्या तसेच गॅसच्या वस्तूंना आधार द्या.

– डॉ. टी. विजयकुमार, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT