पशु - पक्ष्यांकडे होत असलेले दुर्लक्ष  sakal
नांदेड

Nanded : चिमण्यांचा चिवचिवाट झाला कमी

निसर्गासह मानवी जीवनावरही परिणाम

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सध्या विकासाच्या नावाने होत असलेली वृक्षतोड, मोबाईलच्या लहरी, प्रदूषण यामुळे शहरातील चिमण्यांचा चिवचिवाट कमी होताना दिसत आहे. शिवाय प्रदूषणाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

जंगलतोड, मोबाईचा अतिरेकी वापर, वाढत्या प्रदूषणाचा फटका तसेच मानवाचे पशु - पक्ष्यांकडे होत असलेले दुर्लक्ष या सर्व प्रकारचा परिणाम निसर्गावर तसेच मानवी जीवनावर होऊ लागला आहे. याकडे जागरुक नागरिकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले आहे.

पूर्वी अंगणामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळत होता. त्यावेळी आई आपल्या लेकराला एक घास चिऊचा, एक घास बाळाचा असे म्हणत लेकराला जेऊ घालत होती. शहरातून जवळपास चिमण्या गायब झाल्या आहेत तर ग्रामिण भागात काही ठिकाणी चिमण्या आढळून येत आहेत. आता चिऊची जागा मोबाईलने घेतली आहे.

परिणामी वृक्षतोडीमुळे सिमेंटची जंगले तयार झाल्याने चिमण्यांची संख्याही कमी झाली आहे. ग्रामीण भागात अधिक चिमण्या व पाखरे दिसायची. मात्र, आता त्यांची संख्या फार कमी झाली आहे. कावळे, इतर छोटे पक्षी, चिमण्या दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. चिमण्या दिसणे काही काळानंतर बंद होईल, अशी भीती पक्षीमित्रांना वाटू लागली आहे.

मानवी आरोग्यावरही परिणाम

विकासाच्या नावावर होत असलेली बेसुमार वृक्षतोड व सर्वत्र वाढत असलेले सिमेंटचे जंगल यामुळे निसर्गाचे चक्रच बदलले आहे. या साऱ्या विघातक घटकांना परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. सोबतच पशू पक्ष्यांवर याचा मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.

या चिमण्यांनो परत फिरा रे....

पूर्वी शहरात असलेले आणि आता ग्रामिण भागातही गावागावात मोबाईल टाॅवरचे जाळे झाले, हे देखील याला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पूर्वी खेड्यामध्ये दिसणारा चिमण्यांचा चिवचिवाट आता कमी ऐकू येत आहे. आता चिमण्यांचे संवर्धन करण्याची वेळ आली असून ‘या चिमण्यांनो परत फिरा रे...’ अशी साद घालण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

नागरिकांनी राहावे जागरुक

भविष्यात चिमणी हा पक्षी पुस्तकातच चित्ररुपाने पाहण्याची वेळ येईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. चिमण्यांचा चिवचिवाट अलीकडे ऐकायला मिळत नाही. ग्रामीण भागात मोठ्या मुश्कीलीने एखादी चिमणी नजरेस पडते.

त्यामुळे आता चिमण्यांचा चिवचिवाट जवळपास बंदच झाला आहे. चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा आणण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून घराच्या गॅलरीत, अंगणात किंवा छतावर अन्न व पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन पक्षी मित्रांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT