Nanded Sakal
नांदेड

Nanded : चोरीच्या अडीच लाखाच्या आठ दुचाकी जप्त

तपास करुन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सुचना गुन्हे बैठकीमध्ये दिल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - शहरातील वजिराबाद पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरी गेलेल्या दोन लाख ४० हजाराच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच पोलिसांनी चोरीच्या दुचाकी घेणाऱ्यांवरही कारवाई केली आहे.

नांदेड शहरामध्ये दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उप विभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याकडे बारकाईने

तपास करुन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सुचना गुन्हे बैठकीमध्ये दिल्या होत्या. त्यानुसार वजिराबादचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक शिवराज जमदडे, पोलिस जमादार दत्तराम जाधव, विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, मनोज परदेशी, बालाजी कदम, इम्रान शेख, भाऊसाहेब राठोड, रमेश सुर्यवंशी यांनी सापळे रचून शोध सुरू केला.

सोमवारी रेल्वेस्थानक परीसरामध्ये सापळा रचून चोरटयांचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी एकाकडे चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकी आढळुन आल्याने त्यास पकडुन त्याचे नाव विचारले असता त्यांने धम्मपाल उर्फ धम्मा भिमराव कसबे (वय २५, रा. चाभरा, ता. अर्धापूर, हल्ली मुक्काम सांगवी, नांदेड) असे सांगितले.

त्याच्याकडे विचारणा केली असता ती चोरीची असल्याचे सांगितले. त्यानंतर अधिक तपास केला असता त्यांच्या घरी चोरीच्या दोन व चाभरा गावामध्ये पाच दुचाकी विक्री केल्याची माहिती दिली. आरोपीच्या सांगण्यावरुन एकुण आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर प्रकरणी वजीराबादसह विमानतळ, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून दुचाकी विकत घेणाऱ्यांवर सुध्दा चोरीचा माल खरेदी केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस जमादार विठ्ठल उतकर व प्रदीप खानसोळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात तब्बल 'इतक्या' रूपयांची वाढ, चांदी मात्र ५००० रुपयांनी घसरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

बापरे श्रद्धा कपूरला काय झालं! ‘ईठा’च्या चित्रीकरणात दुखापत; लावणी सीक्वेन्सदरम्यान पायाला फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update: : पुण्यात वाघोली- लोहगाव रोडवर कारला भीषण आग

Pune News : ऊसाच्या वजन चोरीवर साखर आयुक्तांचा कडक पवित्रा! 'भरारी पथके' कार्यान्वित, वजनकाटा तपासणीत आयटी तज्ज्ञ होणार सहभागी

Pune Accident: मी पोलिसाचा मुलगा, पार्टी करून आलेल्या तरुणांचा नारायण पेठेत धिंगाणा, अपंग व्यक्तीला धडक! रात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT