मतदान Sakal
नांदेड

‘देगलूर-बिलोली’त ६५ टक्के मतदान

पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले.

सकाळ वृत्तसेवा

देगलूर (जि. नांदेड) : देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले. यात १२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत या मतदारसंघात झाली.
सार्वजनिक बांधकाममंत्री व नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीत राजकीय शक्ती लावत महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांना प्रचारात उतरविले होते.

दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे अकाली निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांची गर्दी होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT