file photo 
नांदेड

नांदेड : उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत विदेशी दारु जप्त

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. १५) डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत शहराच्या नंदीग्राम सोसायटी परिसरातून सहा हजार ६८० रुपये किमतीची विदेशी दारु जप्त केली असून एकास अटक केले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरुन नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटी येथे छापा मारला. या छाप्यात गोवा राज्य निर्मित विदेशी दारुच्या सहा हजार ६८० रुपये किमतीच्या ६० बाटल्या जप्त करुन एकास अटक कोेले. या पथकात निरिक्षक सुभाष खंडेराव, साहेबराव बोदमवाड, अमजद पठाण, दुय्यम निरिक्षक भगवान मंडलवार, ज्योती गुट्टे, मोहम्मद रफी, श्री. खिल्लारे, श्री. संगेवार, श्री. भालेराव आदींचा समावेश होता.

वाहन चालक, मालकांना थकीत कराची रक्कम भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुभा

नांदेड : शासन परिपत्रक व राज्याचे परिवहन आयुक्त यांचे ता. 3 डिसेंबरच्या पत्रानुसार जे वाहन मालक त्यांचा वाहनाचा 31 मार्च 2020 पर्यंत थकीत असलेला कर,  दंड व व्याजासहीत 31 डिसेंबर 2020 पर्यंत भरतील. त्यांना शासनाने कोविड-19 या विषाणुद्वारे उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे वार्षिक कर भरणाऱ्या परिवहन वाहनांना जाहीर करण्यात आलेल्या  सवलतीचा (Tax Exemption) लाभ घेता येईल. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांने 31 डिसेंबर 2020 पूर्वी कार्यालयात येऊन त्यांचे वाहनांचा 31 मार्च 2020 रोजी पर्यंत कर भरणा करावा लागेल, याची नांदेड जिल्हयातील सर्व वाहन चालक, मालकांनी सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश्वरी मुंडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

SCROLL FOR NEXT