Death Sakal
नांदेड

दर्शनासाठी गेले अन् घात झाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : नांदेड येथील जगतुंग तलावात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृत्यू झालेले कुटुंब हे नांदेड शहरातील असल्याचं समोर आलं आहे. हे कुटुंब जिल्ह्यातील कंधार येथे असलेल्या दर्ग्यात दर्शनासाठी गेले असताना ही घटना घडली आहे.

(5 Family members Death by drowned)

नांदेड शहरातील एका कुटुंबातील सर्वजण कंधार येथील एका दर्ग्याचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. काहीजण दर्ग्यात दर्शनासाठी गेले असताना या कुटुंबातील पाचजण तेथे असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये कुटुंबातील दोन सख्ख्या भावाचा सामावेश आहे. या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या घटनेची चौकशी करून पीडित कुटुंबाला मदत करण्याची मागणी केली आहे.

महोमद साद, सय्यद सोहेल, सय्यद नाविद आणि महोमद आफ्रिदीन अशी मृतकांची नावे आहेत. तर मृत्यू झालेले सर्वजण १३ ते २३ वयोगटातील आहेत. यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलंय की, "नांदेड येथील पाच किशोरवयीन मुलांचा कंधारच्या जगतुंग तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून पीडित कुटुंबांना मदत करावी, अशी माझी मागणी आहे." असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT