Nanded Sakal
नांदेड

Nanded: नदीपात्र ओलांडून गाठावे लागते शेत; ‘कयाधू’वर पुलाची मागणी दुर्लक्षित

याच काळात खरीप हंगाम जोरात असल्याने प्रत्येकाची पावले शेतीकडे वळतात.

सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी - कयाधू नदीवर पूल नसल्याने कोंढूर व डिग्रस (ता. कळमनुरी) येथील शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतामध्ये जा-ये करण्यासाठी कसरत करवी लागते. डोक्यावर शेतीचे साहित्य घेऊन नदीच्या पाण्यातून वाट काढत शेत गाठावे लागते.

कोंढूर, डिग्रस येथील ग्रामस्थांची कयाधू नदीच्या पलीकडे शेती आहे. पावसाळा वगळता नदीत फारसे पाणी नसते किंवा पात्र कोरडे असते. त्यावेळी शेतकऱ्यांना जा-ये करण्यात अडचणी येत नाहीत. पावसाळ्यात मात्र नदीपात्र दुथडी असते.

वारंवार पूर येतो. याच काळात खरीप हंगाम जोरात असल्याने प्रत्येकाची पावले शेतीकडे वळतात. नदीला पूर आल्यास अनेकांची शेतीकामे ठप्प होतात.तरीही अनेक जण कामे वेळेत उरकण्याच्या प्रयत्नात जीव धोक्यात घालून नदीपात्र ओलांडतात.

अनेक शेतकरी शेती उपयोगी साहित्य डोक्यावर घेऊन नदीच्या पाण्यातून वाट काढत शेती गाठतात. नदीवर या भागात पूल बांधावा, अशी मागणी सातत्याने होते. त्याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT