file photo 
नांदेड

नांदेडमध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या तर दुसर्‍या घटनेत तलावात बुडून जावयाचा मृत्यू

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या काही थांबता थांबेनात. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ता. २० ते २१ जानेवारीच्या दरम्यान जानापुरी (तालुका लोहा) शिवारात घडली. दुसर्‍या घटनेत कंधार तालुक्यातील हाडोळी परिसरात तलावात बुडून जावयाचा मृत्यू. या प्रकरणी सोनखेड आणि कंधार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोहा तालुक्यातील जानापुरी येथील शेतकरी तिरुपती परसराम कदम (वय २७) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी व होत होती. या वर्षी अतिवृष्टी झाल्याने पिकाचे नुकसान झाले. नेहमीच नैसर्गिक आपत्ती येत असल्यामुळे त्यांनी आपला घरगाडा चालविण्यासाठी कर्ज काढले. शेतातील उत्पन्न घटल्याने कर्जाची परतफेड त्यांना करता येत नव्हती. या तणावातून त्यांनी आपल्याच शेतात आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी माधव परसराम कदम यांच्या माहितीवरुन सोनखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर करत आहेत.

जावयाचा सासुरवाडीत मृत्यू

दुसर्‍या घटनेत कंधार तालुक्यातील कुरुळा येथील यादव रामा कांबळे (वय ३०) हे आपली सासुरवाडी हाडोळी येथे आले होते. ते ता. २० जानेवारीच्या सकाळी शौचालयास गेले होते. शिवारात असलेल्या एका पाण्याच्या तलावातून ते बाचलीमध्ये पाणी काढत असतांना त्यांचा तलावामध्ये पाय घसरुन तोल गेला व ते त्यात पडले. पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. घटनेची माहिती भुजंग कांबळे यांनी कंधार पोलिसांना दिली. त्यांच्या माहितीवरुन कंधार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस हवालदार श्री चोपडे करत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT