Nanded farmer six lakh 73 thousand quintals of gram Purchase sakal
नांदेड

नांदेड : सहा लाख ७३ हजार क्विंटल हरभरा खरेदी

३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; हमी दरानुसार ५४ ठिकाणी खरेदी केंद्र

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार नाफेडने तीन यंत्रणेच्या माध्यमातून ५४ ठिकाणी सहा लाख ७३ हजार २७३ क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. आॅनलाईन नोंदणी केलेल्या ४० हजार ८४९ शेतकऱ्यांपैकी ३५ हजार २६४ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून देण्यात आली.

रब्बी हंगाम २०२२ खरेदी योजनेतंर्गत यंदा जिल्ह्यात किमान हमी दरानुसार हरभरा विक्रीसाठी ता. एक मार्च पासून सुरुवात झाली. यात दि महाराष्ट्र स्टेट मार्केटींक फेडरेशन मुंबईकडून दहा, विदर्भ मार्केटींक फेडरेशन नागपूरकडून दोन तर महाफार्मर प्रोड्यूसर कंपनी पुणे कडून ४२ अशा एकूण ५४ ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचा हरभरा खरेदी करण्याची मुदत प्रांरभी ता. २७ मे पर्यंत निश्‍चित केली होती. यानंतर यास ता. १७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

परंतु शासनाने निर्धारीत केलेला खरेदीचा कोटा पूर्ण झाल्यामुळे खरेदी यापूर्वीच बंद करण्यात आली. यामुळे बरेच शेतकरी हरभरा विक्री विना शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात या कालावधीत आॅनलाइन नोंदणी केलेल्या ४० हजार ८४९ शेतकर्‍यांपेकी ३५ हजार २६४ शेतकर्‍यांचा सहा लाख ७३ हजार २७३ क्विंटल हरभरा खरेदी केला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून देण्यात आली.

महिन्यापासून चुकारे थकले

हरभरा खरेदीच्या अंतिम टप्यात शासकीय खरेदी केंद्रावर हरभरा दिलेल्या शेतकर्‍यांचे चुकारे मागील एक महिन्यापासून थकले आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात शेतकर्‍यांना हरभर्‍याचे पेसे मिळत नसल्याने ते खरेदी केंद्र संचालकांच्या मागे आहेत. परंतु नाफेडकडून पैसे मिळाले नसल्याने चुकारे थकल्याची माहिती केंद्र चालक देत आहेत. परंतु शेतकरी ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे एका केंद्र चालकाने सांगितले.

हरभरा खरेदीत महाएफपीसी अव्वल

जिल्ह्यात हमी दरानुसार सर्वाधीक चार लाख ८६ हजार ३२० क्विंटल हरभरा खरेदी महाएफपीसी ४२ केंद्रावर झाली. तर महाराष्ट्र स्टेट मार्केटींक फेडरेशनच्या दहा खरेदी केंद्रावर एक लाख ४० हजार ४०७ क्विंटल व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या दोन खरेदी केंद्रावर ४६ हजार ५४५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT