नांदेड - अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले.  sakal
नांदेड

नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

काही शेतकऱ्यांनी कुडाचे छप्पर काढून पक्के बांधकाम करायचे ठरवले होते.

वैभव पाटील

नायगाव : यंदा पाऊस चांगला झाल्याने सोयाबीन चांगले येईल. त्यावर मुलीचे लग्न करता येईल. काही शेतकऱ्यांनी कुडाचे छप्पर काढून पक्के बांधकाम करायचे ठरवले होते. परंतु, एका रात्रीत अतिवृष्टीमुळे मुरुडा नदी पूर आला. अन् असंख्य शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. शेतात पिकले, तेवढे मातीसह वाहून गेले. पशुधनही दगावले, आता पुन्हा संसार शुन्यापासून कसा उभा करायचा? अशी अवस्था नायगाव, पाडोळी, बोरगाव, रायगव्हाण या गावांतील नागरिकांची झाली आहे.

२७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीने परिसरातील मुख्य नद्या व उपनद्यांना पूर आला. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले. याच दिवशी रात्री अचानक मुरुडा नदीला मिळणाऱ्या नदीचे पाणी तुंबले. त्यामुळे नदी काठच्या शेतजमिनीसह ऊस व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. शिवाय नायगाव, पाडोळी, बोरगाव, रायगव्हाण या गावांची पिके काही दिवस पाण्यातच होती. तर नायगावच्या मनमत बेलगुरे यांनी पाच बॅगचे काढून ठेवलेल्या सोयाबीनचा ढीग वाहून गेला.

झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी बाळगलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. आता शासनाने तातडीने सरसकट मदत करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

सलग तिसऱ्या वर्षी शेतातील सोयाबीन अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. भावाच्या दवाखान्यासाठी झालेले खर्चातून आता सावरायची वेळ होती. सोयाबीनवर देणे देऊन मुलांचे शिक्षण करायचे ठरवले होते. पण, निसर्गाने सर्व काही नेले. आता उरले- सुरले सोयाबीनचे पीक चिखलात आहे.

-कल्याण पांचाळ, नायगाव

माझ्या शेतात सोयाबीनसह जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे पीक तर गेलेच पण जमीनही नापिक झाली आहे. आता भविष्य अंधारात दिसत आहे.

-देविदास गोरे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT