उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस esakal
नांदेड

Nanded : शेतकऱ्यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

विष्णुपुरीसह तीन कालव्यांना नऊ पाणी पाळ्या द्या

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : विष्णुपुरीसह डेरला, शिराढोण लिफ्ट योजनेच्या कालव्यांना नऊ पाणी पाळ्यांचे रब्बी, उन्हाळीसाठी नियोजन करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता यांना देऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जल सिंचनाचा अनुशेष भरून काढून न्याय द्यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

विष्णुपुरी प्रकल्प डेरला लिफ्ट भागातील लाभार्थी शेतकरी असून त्यांच्यामार्फत ही मागणी करण्यात आली आहे. रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये चारा पिके गहू, हरभरा, भुईमूग, ऊस ही पिके लागवडी करता योग्य वास्तव न्याय पाण्याचे नियोजन आवश्यक आहे.

विष्णुपुरी प्रकल्प हा संपूर्ण भरलेला आहे. त्या अंतर्गत अंतेश्वर बंधारा, दिग्रस बंधारा हा पण पूर्ण भरलेला आहे. असे एकूण ८४ दलघमी पाणी अधिक दिग्रसचे ४० दलघमी तसेच अंतेश्वर बंधार्‍याचे अंदाजे २५ दलघमी असे एकूण अंदाजे १४५ दलघमी पाणी उपलब्ध आहे व गोदावरी वरच्या दिशेने आजपर्यंत पाणी वाहत आहे.

तसेच जायकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे व त्यावरील सर्व बंधारेसुद्धा पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. त्यामुळे या सर्व पाण्याचा योग्य वापर नियोजन करून विष्णुपुरी प्रकल्प डेरला शिराढोण लिफ्ट यांना नऊ पाळी पाण्याचे नियोजन करून सुशासनाचा अनुभव द्यावा.विष्णुपुरी प्रकल्प हा आशिया खंडातला सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे. नियोजित लाभ क्षेत्र पंचवीसहजार हेक्टर होते, त्यामध्ये पाच लिफ्ट आहेत. त्यातली पहिली लिफ्ट डेरला लिफ्ट आहे व तिसरी शिराढोण आहे.

तरी नऊ पाणी पाळीचे नियोजन करावे व शेतकर्‍याला लहरी हवामानाच्या फटक्यातून सुशासनाद्वारे योग्य नियोजन करून न्याय द्यावा व शेतकर्‍याचा जलसिंचनाचा आणि आर्थिक अनुशेष भरून काढावा, अशी मागणीही प्रा. सोनखेडकर यांच्यासह एकनाथ मोरे, माधव देसाई, बालाजी जाधव पिंपळवाडीकर, खुशाल पाटील दगडगावकर, पाटील पळशीकर, प्रकाश देसाई बोरगावकर, अंबादास जवळेकर, संतोष पाटील जानापुरीकर आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT