file photo
file photo 
नांदेड

नांदेड : शेतकरी पुन्हा नव्या स्वप्नांची पेरणी करायला सज्ज

रामराव मोहिते

घोगरी (जिल्हा नांदेड) : यंदा पाऊसमान चांगलं राहिल्याने, शेतकऱ्याच्या रब्बीच्या आशा पल्लवीत  झाल्या आहेत, तो पुन्हा नव्या स्वप्नांची पेरणी करायला सज्ज झाल्याचे चित्र आहे. भविष्याची कसलीही हमी नसताना तो धरणी मातेची कुश पुन्हा-पुन्हा उधळू पाहतोय. हे युगानयुगे असेच चालणार आहे. 

गत पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या परिसरात पावसाचे प्रमाण बर्‍यापैकी होण्याने, पेरलेल्या पिकाची वाढ जोमदार झाल्याने उत्पन्न बऱ्यापैकी होईल अशी आशा बळावली असतानाच, दत्तू वर्षीप्रमाणे याही वर्षी परतीच्या पावसाने पुन्हा कहर केला. काढणीस आलेल्या सोयाबीन पिकात पाणी साचल्याने, शिवाय फळाफुलांनी लदबदलेला कापूसही, बोंडे सडून वाया गेल्याने शेतीत टाकलेला खर्च ही निघतो की नाही या काळजीत बळीराजा आहे.

गेली सहा महिन्यापूर्वी एका सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणूनं अवघ्या जगावर स्वारी करून अखंड मानवजातीला ठाणबंद केलं. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेती मालाच अतोनात नुकसान झालं. नंतर परतीच्या पावसाने नुकसानीची राहिलेली कसर भरून काढल्याने बेजार झालेला बळीराजा हा आशावादी म्हणावा लागेल.

पाऊस मान चांगलं राहिल्यानं पुन्हा जुन्या कडू आठवणी विसरून पुन्हा नव्या स्वप्नांची पेरणी करायला सज्ज झाला आहे. शेतकऱ्यावर प्रतिवर्षी येणारी अस्मानी आणि सुलतानी संकट यंदा अधिकच गहिरी झाली असतानाच, व पेरलेले ही निघेल की वाया जाणार याची पूर्णपणे खात्री नसतानाही तो धरणी मातेची कूस पुन्हा पुन्हा उजळू पाहतोय. हे युगानुयुगे असं चालणार आहे. शेतकऱ्यांनी पेरावं, पुन्हा अस्मानी-सुलतानी संकटं येऊन वाया जात आहे. शासनाच्या वतीने अनुदान दिले जाव हे नित्याचं घडत असल्याने जगाचा पोशिंदा एका नव्या संकटात सापडलेला दिसतो आहे. यातून लवकर सावरून या जगावर पुन्हा बळीच राज्य येईल का हे पाहणे गरजेचे आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT