file photo 
नांदेड

नांदेड : अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हरीहरराव भोसीकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी (ता. १६) मुंबई येथे पक्ष कार्यालयात भोसीकर यांना नियुक्ती पत्र दिले. 

माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची हाताची घडी बाजूला ठेवून त्यांनी ऐनवेळी लोकसभा निवडणुकीत भाजपचे कमळ हाती घेतले होते. त्यानंतर गेले वर्षभर हे पद रिक्त होते. मध्यंतरी काही काळ माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्यावर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पदाची जबाबदारी टाकली होती. त्यानंतर पक्ष निरीक्षकांना पाठवून पक्षाने जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चाचपणी केली होती. जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशींग बाधले होते. 

मात्र अखेर हरिहरराव भोसीकर यांना बुधवारी मुंबई येथे पक्ष कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र दिले. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोरे तसेच ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, पक्ष निरीक्षक अविनाश आदीक, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याशी चर्चा करुन जयंत पाटील यांनी नांदेड जिल्हाध्यक्ष ग्रामीण पदाच्या निवडी बाबत निर्णय घेतला. हरिहरराव भोसीकर यांच्या निवडीमुळे पक्षाने अल्पसंख्यांक लिंगायत समाजातील व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती दिल्याने सर्वत्र आनंद व्यकक्त होत आहे. मागील काळापासून पक्षाला आलेली मरगळ काढून टाकण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेल असा विश्वास श्री. भोसीकर यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT