वाई बाजार (जिल्हा नांदेड) : महाराष्ट्र राज्यासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माहूर गडावरील रेणुका देवी संस्थानच्या सभोवतालच्या जंगलांमध्ये वनवा पेटल्यामुळे काही वेळातच अग्नीने रौद्ररुप धारण करुन संपूर्ण मंदिर परिसराला वेढा घातला होता. रेणुका गडावरील व्यापारी मंडळीने प्रसंगावधान राखून अग्निशमन दल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केल्यामुळे शर्थीचे प्रयत्न केले गेले व अवघ्या काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. मंगळवारी (ता. सहा) एप्रिलच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास गडावर लागलेल्या आगीचे ज्वाला इतके प्रचंड होते की, काही वेळ ही आग अशीच धगधगत राहिली असती तर श्री. रेणुका देवी मंदिर संस्थांसह संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने आगीत जळून खाक झाली असती.
माहूर जिल्हा नांदेड येथील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या श्री. रेणुकादेवी संस्थानाच्या परिसरातील जंगलात काल रात्री आठ वाजताच्या सुमारास लागलेल्या वणव्यामुळे श्री रेणुका देवी मंदिर पलीकडच्या दत्तशिखर अरण्याकडून लगतच्या श्री. परशुराम मंदिर व रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याशी वनवा पेटला, आगीचे जवळा इतक्या भीषण मोठ्या होत्या की आगीने बघता बघता रौद्ररुप धारण केले. मात्र गडावरील व्यापारी मंडळी, वनविभागाचे कर्मचारी आणि नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखून प्रयत्नाची पराकाष्टा करत वेळेत पोहोचून अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळविल्याने माहूर वनपरिक्षेत्रच्या धनदाट जंगलामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात सातत्याने वणवा पेटत असतो.
हेही वाचा - सकारात्मक मानसिकतेसह रोग प्रतिकारशक्ती वाढवल्यास कोरोनाला हरवणे शक्य - डॉ. संदीप देशपांडे
मागील काही दिवसाखाली न्यायालय परिसरात दोन वेळेस वनवा पेटला होता. त्याही वेळेस अग्निशमन दलाने आपली कामगिरी दाखवली. लॉकडाउन व संचारबंदी मुळे रेणुकादेवी गडावरील दुकाने बंद असल्याने व्यापारी घटनास्थळावर हजर नव्हते. परंतु घटनेची माहिती समजताच सर्व व्यापाऱ्यांनी घटनास्थळ गाठून आपत्कालीन यंत्रणेला अवगत करुन ही आग विझवली. दरम्यान सन 1995 मध्ये अशा स्वरुपाचा अग्नितांडव रेणुका देवी मंदिर गळा सह परिसरात पाहायला मिळाला होता. या घटनेची आठवण करत प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितल्याप्रमाणे क्षणाचाही विलंब झाला असता तर महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेले साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ श्री. रेणुका देवी मंदिर व संस्थांनासह 125 व्यापारी प्रतिष्ठाने या आगीत जळून खाक झाली असती. माहूरगडावरील रात्री घडलेल्या या घटनेमध्ये वनविभागाचे कर्मचारी नगरपंचायतचे अग्निशमन दल यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे प्राणहानी व मोठी वित्तहानी टळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.