फोटो
फोटो 
नांदेड

नांदेड : दीड लाखाच्या मद्यासह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : अवैधरित्या काळ्या बाजारात मद्य विक्री करणाऱ्यांच्या मागावर पोलिस आहेत. अशाच एका मद्य विक्री करणाऱ्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख ५५ हजाराची विदेशी दारु व एक चार चाकी वाहन असा पाच लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामिण पोलिसांनी चंदासिंग कॉर्नर परिसरात असलेल्या दिक्षानगर, बळीरामपूर येथे मंगळवारी (ता. सात) सायंकाळच्या सुमारास केली.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरातील व जिल्ह्यातील काही दुकानांना जिल्हाधिकारी यांनी उघडण्याची परवानगी दिली नाही. ज्यात बीअर बारचा समावेश आहे. मात्र वान मार्ट व बीअर शॉपीला पारवानीग दिल्याने सायंकाळी पाचच्या नंतर दुकाने बंद करुन दुकानमालक आपल्याकडील मद्य काळ्या बाजाता चढ्या दराने विकत आहेत. काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी नांदेड शहरातून वेगेवगेळ्या मार्गाने तालुकास्तरावर मद्याचा माल जातो. परंतु अशा विनापरवाना मद्य वाहतुक करणाऱ्या वाहनांंची पोलिसांकडून कसुन चौकशी सुरू आहे. यातच पोलिसांच्या तावाडीत एकजण सापडला.

मुखेडच्या साईनाथ नामदेव बाजगीरेला अटक

मुखेड शहरातील फुलेनगर भागात राहणारा साईनाथ नामदेव बाजगीरे (वय ५०) हा आपल्या क्रुजर (एसएच२६-व्ही- २१३८) मधून विविध कंपनीचे मद्य मुखेडकडे घेऊन जात होता. ही गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने नांदेड ग्रामिण पोलिसांना सतर्क केले. चंदासिंग कॉर्नर परिसरात नाकाबंदी लावून नांदेडमधून निघालेली वरील क्रमांकाची क्रुजर पोलिसांनी दिक्षानगर, बळीरामपूर येथे येताच पोलिस उपनिरीक्षक असद शेख यांनी आपल्या सहाकऱ्यांमार्फत थांबविली. 

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चालक साईनाथ बाजगीरे यास ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली. यावेळी पोलिसांना वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी मद्य (दीड लाख) रुपयाचे आढळून आले. याबाबत विचारणा केली असता चालकाने उडावाउडवीची उत्तरे दिली. यावरुन हा मुद्देमाल चोरीने जात असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी साईनाथ बाजगीरेला अटक करून त्याच्याकडील दारु व वाहन जप्त केले. पोलिस नाईक प्रभाकर मलदोडे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT