file photo 
नांदेड

नांदेड : देहदानातून जीवनदान देण्याचा पाच ज्येष्ठ महिलांचा संकल्प

प्रल्हाद कांबळे

नांदेड - मरावे पर किर्ती रूपी उरावे, या उक्तीप्रमाणे जीवन संपल्यानंतर आपलाही समाजाच्या गरजूंना काही तरी उपयोग व्हावा, या उद्दात भावनेतून पाच ज्येष्ठ महिलांनी देहदान करत जीवनदान देण्याचा संकल्प केल्याने त्यांच्या सामाजीक दायीत्वाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.


सध्या ग्रीन कॅरोडोर फार गरजेचे मानले जात आहे. आपले जीवन संपल्यानंतरही साधारण सहा ते सात जणांना जीवनदान देण्याचा हा संकल्प कौतुकास्पद आहे. सदरील देहदानाची चळवळ आणखी व्यापक करण्याची खरी गरज आहे. जनसामान्यांना त्याचे महत्व पटवून दिले तर शेकडो लोक पुढाकार घेऊ शकतात. हीच सामाजीक भावना जपत शहरातील पाच ज्येष्ठ महिलांनी थेट शासकीय रूग्णालयात जाऊन नियमाप्रमाणे फॉर्म भरून मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला.

पाचही महिला विपश्यनेचे महत्व, व्यसनमुक्तीसह विविध कार्यात सदैव अग्रेसर असतात. साठी ओलांडलेल्या या महिलामध्ये लेबर कॉलनी येथील शशीकलाबाई पाडमुख, राजाबाई कामठेकर, हर्षनगरच्या अंजनाताई बहात्तरे, भावसार चौक परिसरातील अनिकेतनगर येथील सुभद्राबाई सावंत व पंचशीलनगरच्या कांताबाई आठवले यांचा समावेश आहे.


समाजातील प्रत्येकांनी त्यांचा आदर्श घेऊन मरणोत्तर देहदान केले तर गरजवंताना त्यांचे आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडेल, असे सर्वांचे मत आहे. पाच महिलांचा संकल्प समाजातील सर्वच घटकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत असताना दिसून येत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT