file photo 
नांदेड

नांदेडला मंगळवारी ५८ कोरोनामुक्त; ३४ पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी (ता. दहा) सायंकाळी आलेल्या अहवालात ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३० रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी २३ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. दरम्यान, दिवसभरात ५८ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्के इतके आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. मंगळवारी सायंकाळी एक हजार १६० रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार १११ अहवाल निगेटिव्ह आले तर ३४ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १९ हजार ५१२ एवढी झाली आहे. मंगळवारी आलेल्या ३४ अहवालांपैकी १५ आरटीपीसीआर तर १९ ॲन्टीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे आले आहेत. त्यामध्ये नांदेड महापालिका, नांदेड ग्रामिण, लोहा, अर्धापूर, देगलूर, हदगाव, हिंगोली आणि यवतमाळ या शहरांचा समावेश आहे. 

५८ जण झाले कोरोनामुक्त
दरम्यान, रुग्णालयातील ५८ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सुटी दिलेल्या रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या १८ हजार ४७४ झाली आहे. दरम्यान, उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयातील तामसा (ता. हदगाव) पुरूष (वय ६९) याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ५३३ झाली आहे. 

३३० रुग्णांवर उपचार सुरू
सध्या रुग्णालयात ३३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २३ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. सध्या ३५३ प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी शिल्लक आहेत. त्याचबरोबर मंगळवारी (ता. दहा) सायंकाळी पाच वाजेपर्यंत विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १५९ तर नांदेडच्या जिल्हा रुग्णालय कोविड सेंटर येथे ७४ खाटा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्के इतके आहे.
 
हेही वाचलेच पाहिजे - नांदेड ः कंधारची ‘एसबीआय’ बनली दलालांचा अड्डा 

नांदेड कोरोना मीटर   

  • एकूण स्वॅब - एक लाख २२ हजार ७६०
  • एकूण निगेटिव्ह - ९९ हजार ८२३
  • एकूण पॉझिटिव्ह - १९ हजार ५१२
  • मंगळवारी पॉझिटिव्ह - ३४
  • एकूण बरे रुग्ण - १८ हजार ४७४
  • मंगळवारी बरे - ५८
  • एकूण मृत्यू - ५३३
  • मंगळवारी मृत्यू - एक
  • सध्या उपचार सुरू - ३३०
  • अतिगंभीर रुग्ण - २३ 
  • प्रलंबित स्वॅब संख्या - ३५३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : पर्रिकर न सांगता फिरायचे तसे फिरा, पुण्यातील महिलेनं सल्ला देताच अजित पवार म्हणाले, कोण पर्रिकर? नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Heavy Rain: गेवराईत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस; नदी नाल्यांचा पाणी ओसांडून अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात

Kolhapur Crime : पहाटे चोरी करून रात्री थ्री स्टार हॉटेल मजा मारायची, लूटमारीचा चंगळवाद; CCTV मध्ये सापडताच पोलिसांनी केला कार्यक्रम

Mental Health: दर सात जणांपैकी एकाला मानसिक विकार; २०२१ मधील जगभरातील स्थिती, एक अब्ज जणांना त्रास, ‘डब्लूएचओ’ची माहिती

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

SCROLL FOR NEXT