Nanded Gandhinagar citizen inconvenient 
नांदेड

नांदेड : चार वर्षांनंतर गांधीनगरात शाळा गजबजली

नदीपात्रातून वाट काढीत अन् चिखल तुडवीत शिक्षणाधिकारी दिग्रसकर पोहाेचले गांधीनगरात

एकनाथ तिडके

माळाकोळी - लोहा शहरा जवळील धानोरा मक्ता गाव..नदीच्या पल्याड...गांधी नगर..वस्ती शंभर उंबरठ्याची..पण दोन गावात नदी... शाळा बंद....थेट जिल्ह्याचे जिल्हाधिकारी...सीईओ यांनी लक्ष घातले. जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, बिईओ सोनटक्के आदी नदी पात्रात गुडघाभर पाण्यातून वाट काढीत नदीच्या पल्याड पुढे अडीच किमीचा चिखलमय रस्ता तुडवीत शिक्षणाधिकारी गांधी नगरात गेले. आणि शाळा पुन्हा गजबजल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

या भागातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात नदी पात्रातून वाट काढीत आणि दोन किमी चिखल तुडवीत धानोरा मक्ता येथील शाळेत यावे लागत होते. या बाबत अनेकदा प्रयत्न केले पण यश आले नाही. प्रहार संघटना तालुका अध्यक्ष माऊली गीते यांनी याबाबतचे फोटो, व्हिडिओ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्याकडे पाठविले. तसेच तहसीलदार मुंडे, गटविकास अधिकारी वाव्हूले, गट शिक्षणाधिकारी सोनटक्के यांचे लक्ष वेधले. मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्षा ठाकूर यांनी तातडीने याची दखल घेतली. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना गांधीनगर येथे शैक्षणिक अडचण दूर करण्याचे सांगिलते. तसेच गट विकास अधिकारी यांना आवश्यक सूचना दिल्या.

त्यानंतर शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी तातडीने आपली टीम कार्यरत केली. शिक्षणाधिकरी प्रशांत दिग्रसकर बिईओ रवींद्र सोनटक्के हे नदी पात्रातून गुडघ्याभर पाण्यातून वाट काढीत हे पल्याड नदी तीरावर गेले. तेथून दोन किमी चिखलाची वाट तुडवीत हे अधिकारी गांधी नगरात पोहचले. चिखलातून दोन किमी पायपीट करून धानोरा ते गांधीनगर रस्त्याची पाहणी केली. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी गांधीनगर वस्तीतील ग्रामस्थांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय लक्षात घेऊन बंद असलेल्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची तत्काळ तात्पुरती नियुक्ती केली.

हजारो निवेदन, शेकडो आंदोलने तरीही गांधीनगर येथील प्रश्न सुटला नव्हता. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी दखल घेतली. सध्या शाळा सुरू झाली. यापुढे पुलाचा व रस्त्याचा प्रश्न सोडवला जाईल अशी अपेक्षा आहे.

- माऊली गीते, तालुकाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'अजिंक्यतारा, ताराराणी समाधी सुशोभीकरणासाठी २६८ कोटींचा निधी'; साताऱ्यातील ऐतिहासिक संवर्धनास गती येणार..

Easy Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्याला बनवा काहीतरी हेल्दी! आताच लिहून घ्या ज्वारीच्या पुलावाची सोपी रेसिपी

आजचे राशिभविष्य - 08 ऑक्टोबर 2025

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १२०० कोटी! अतिवृष्टी, महापुराचा ‘या’ तालुक्यातील ४.६९ लाख शेतकऱ्यांचे नुकसान; तलाठ्यांकडे द्या ‘ही’ कागदपत्रे

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

SCROLL FOR NEXT