file photo 
नांदेड

नांदेड : हक्काचे घरकुल द्या, अन्यथा आमरण उपोषणातच सरण रचुन आत्मदहन करणार- बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती

प्रल्हाद कांबळे

नांदेड : गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने विविध आंदोलने उपोषणे करून हि अद्याप हक्काचे घरकुल आणि रोजगारासाठी जागा तसेच शासकिय अणुषेश भरून न काढल्याच्या निषेधार्थ कमल फाऊंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन मंगळवारी (ता. 22 ) डिसेंबर  रोजी मनपा आयुक्त डाॅ. सुनिल लहाने यांच्यासह जिल्हाधिकारी डाॅ. विपीन ईटणकर आणि पोलिस अधीक्षकांसह पोलिस निरीक्षक वजीराबाद यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

या निवेदनात बेरोजगार दिव्यांगांनी म्हटले आहे की, आम्ही नांदेड शहरातील विविध प्रभागात भाड्याच्या खोलीत गत 15 वर्षांपासून किरायाने राहत असुन अनेक वेळा निवेदने देऊन तथा आंदोलने उपोषणे करूनही तसेच प्रत्यक्षात भेटुनही अद्याप आम्हा बेरोजगार दिव्यांगांना हक्काचे घरकुल मिळाले नाही. तसेच स्वंय रोजगारासाठी 200 स्क्वेअर फूट जागा सुद्धा मिळाली नाही यासह आमचा शासकीय अणुषेश सुद्धा पुर्णतः भरून काढण्यात आला नाही. परीणामी आम्हा बेरोजगार दिव्यांगांना लोकशाही मार्गाने ता. 28 डिसेंबर 2020 रोजी शेवटचे आमरण उपोषण करावे लागत आहे. कारण याआधी आम्ही बेरोजगार दिव्यांगांनी 68 आंदोलने उपोषणे केली आहेत परंतु आम्हाला आजवर न्याय मिळाला नाहीय

त्यामुळे आम्ही शेवटचेच आमरण उपोषण हे ता. 28 डिसेंबर 2020 रोजी महानगरपालिका नांदेडसमोर करणार असल्याचे तसेच या उपोषणाला जिल्हा प्रशासनाकडुन दुर्लक्ष केल्यास स्वहस्ते सरणं रचुन ऊपोषणास्थळी स्वताला जाळुन आत्मदहन करणार असल्याचे समीती अध्यक्ष राहुल साळवे यांच्यासह नागनाथ कामजळगे.संजय सोनुले, विठ्ठल सुर्यवंशी. विश्वनाथ हंबर्डे. राजकुमार देवकर. शेख आरिफ. गोविंद बोद्देवाड. भाऊसाहेब टोकलवाड आणि माधव बेर्जे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

Bajrang Sonawane: बीडमधील खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pune Water Issue : पाणीप्रश्‍नावरून प्रशासन धारेवर! नियोजन कोलमडल्याचा नगरसेवकांचा आरोप

SCROLL FOR NEXT