file photo 
नांदेड

नांदेड : शेळीपालनातून मिळाला रोजगार; पाच वर्षात माजी सरपंच महिलेची लाखोंची कमाई

विठ्ठल लिंगपूजे

शिवणी ( जिल्हा नांदेड ) : गरीबीवर मात करत सुखी संसाराचा गाडा हाकण्यासाठई शिवणी (ता. किनवट) येथील एका दाम्पत्याने शेळी पालनाचा व्यवसाय सुरु केला. विशेष म्हणजे त्यांना यातून रोजगार मिळाला. एवढेच नाही तर त्यांना पाच वर्षात सहा लाखाची कमाई झाली. त्यामुळे शेळीपालनाचा व्यवसाय चांगला असून बेरोजगार युवकांनी शासकिय नोकरीच्या मागे न पळता स्वयंरोजगार करावा असे आवाहन या दाम्पत्याने केले आहे. 
 
किनवट तालुक्यातील शिवणी येथील माजी सरपंच नरबदा बोंदरवाड व त्यांचे पती यांच्याकडे वडिलोपार्जित दोन एकर शेती असून या दोन एकर शेतीत संसाराचा गाडा हाकणे कठीण जात होते. त्यातच दोन मुलांची शिक्षण शिक्षणासाठी लागणारा पैसा यासाठी काय करावे समजेना झाल्याने त्यांनी सुरुवातीलाच शेती करण्याचे ठरवले. शेती करीत असताना ही निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेती गेल्या चार वर्षात तोट्यात गेल्याने घर गाडा चालवणे अवघड झाले होते.

अशातच महाराष्ट्र शासनाकडून 2016 या वर्षात पाणलोट विकासाच्या माध्यमातून बचत गटाला युती शासनाकडून प्रत्येक बचत गटाला 20 शेळ्या खरेदी करण्यासाठी आर्थीक मदत देण्यात आली होती. या बचत गटाच्या माध्यमातून बचत गटाला शेळीपालनातून आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने देण्यात आल्या. त्यात या दांम्पत्यालाही या योजनेतून लाभ मिळाला होता. गेल्या पाच वर्षात गावच्या सरपंच झाल्याने गाव गाडा हाकत असताना त्यांनी आपल्याला मिळालेल्या शेळ्याकडे लक्ष कमी होऊ दिले नाही. 

त्यामुळे या मिळालेल्या दोन शेळ्यापासून त्यांच्याकडे आज 60 शेळ्या आहेत. त्या शेळ्याची आजच्या बाजार भावानुसार अंदाजित पाच लाख रुपये असून त्यांनी आजपर्यंत दीड लाख रुपयांच्या शेळ्याची बाजारात विक्री केली असुन त्या शेळ्यापासुन मिळणा-या शेणखताचा वापर आपल्या शेतीत केला. त्यातून मिळालेल्या पैशातून घर गाडा व मुलांचे शिक्षण पूर्ण करीत आहेत. त्यातून त्यांनी एक छोटीशी पिठाची गिरणी विकत घेतली. त्यातून मिळालेल्या पैशातून घर चालवण्यास मदत होत आहे असे त्यांनी सांगितले. विषेश त्यातच यावर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पती- पत्नी दोघेही विजयी झाले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! या 10 मागण्या मान्य झाल्यास पगारात आणि पेन्शनमध्ये होणार बंपर वाढ

भररस्त्यात वाघाला घेरलं, नंतर जवळ जाऊन...; ताडोबातील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल

काळजाला भिडणारी घटना! ज्या वडिलांनी हात धरून चालायला शिकवलं, त्यांनाच पोत्यात भरून पार्सल करण्याचा मुलीचा प्रयत्न; पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Zp Election : पुणे जिल्हा परिषदेत आंबेगावला पुन्हा मान; वळसे पाटील कुटुंबाची परंपरा कायम, उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा विवेक वळसे पाटील

SCROLL FOR NEXT